News Flash

नवीन वर्षांतील खूनसत्र सुरूच; दोघांचा निर्घृण खून

नवीन पोलीस आयुक्तांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर नागपुरात सुरू झालेले खूनसत्र थांबलेले नसून दोन खुनांनी नागपूर पुन्हा हादरले. अमरावती मार्गावरील वाडी येथे सोमवारी एका तरुणाचा अनोळखी

| January 22, 2013 03:38 am

नवीन पोलीस आयुक्तांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर नागपुरात सुरू झालेले खूनसत्र थांबलेले नसून दोन खुनांनी नागपूर पुन्हा हादरले. अमरावती मार्गावरील वाडी येथे सोमवारी एका तरुणाचा अनोळखी आरोपींनी दगडाने डोके ठेचून खून केला. सकाळी सात वाजताच्या सुमारास ही घटना घडली. तर उत्तर नागपुरातील आर्य नगरात एका इमारतीच्या वृद्ध रखवालदाराचा मजुराने खून केल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली.
अमरावती मार्गावर वाडी परिसरातल्या नवनीतनगर बस थांब्याजवळ महादेव उर्फ माधव नारायण साळवे (रा. पालकरनगर) याचा सोमवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास अनोळखी आरोपींनी दगडाने डोके ठेचून खून केला. या घटनेची माहिती समजल्यानंतर वाडी पोलीस तेथे पोहोचले. महादेव साळवे कालपासून बेपत्ता होता. खून झाल्याचे समजल्यानंतर साळवे कुटुंबीय घटनास्थळी गेले. मृतदेह महादेवचा असल्याचे त्यांनी ओळखले. पोलिसांनी अनोळखी आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. महादेव अविवाहित होता. गेल्या काही दिवसांपासून तो एका ठिकाणी मजुरीसाठी जात होता. काल सकाळी तो कामावर गेला. रात्री उशिरापर्यंत तो घरी परत न आल्याने त्याच्या कुटुंबीयांना वाडी पोलीस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची नोंद केली. त्याच्या खुनामागील कारण स्पष्ट झाले नव्हते.
खुनाची दुसरी घटना उत्तर नागपुरातील आर्यनगरात रविवारी सायंकाळी घडली. तेथे एका इमारतीचे बांधकाम सुरू असून पुरणलाल सोईदा पारधी हा वृद्ध रखवालदार सुनीता दुग्रेश पाचे या मजुरासह रहात होता. त्या दोघांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय तेथे काम करणाऱ्या आरोपी पप्पू उर्फ देवमण रामभाऊ बोराटे (रा. िझगाबाई टाकळी) या मजुराला होता. यावरून सुनीता व पप्पू या दोघांचा अनेकदा वाद झाला होता.
अनैतिक संबंध असल्याचा सुनीताने अनेकदा इन्कार केला होता. काल सायंकाळी सात वाजताच्या सुमारास पुरणलाल व सुनीता बांधकामाच्या ठिकाणी बसून बोलत होते. पप्पू तेथे आला. त्या दोघांचे हसणे पाहून पप्पू संतापला. त्याने तेथे पडलेल्या लाकडी दांडक्याने (राफ्टर) सुनीताला मारहाण केली. पुरणलाल मध्यस्थी करू लागला. त्यालाही पप्पूने मारहाण केली. पुरणलाल रक्तबंबाळ झालेला पाहून पप्पू तेथून पळून गेला.
गंभीर जखमी सुनीता व पुरणलाल या दोघांना मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपतारादरम्यान रात्री पुरणलालचा मृत्यू झाला.
कोराडी पोलिसांनी सुनीताच्या जबानीवरून आरोपी पप्पू उर्फ देवमण रामभाऊ बोराटे (रा. िझगाबाई टाकळी) याच्या विरुद्ध खुनाता गुन्हा दाखल केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2013 3:38 am

Web Title: murder series continue from new year
Next Stories
1 आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूंची आज बैठक
2 शालेय बसेसची तपासणी होणार
3 सोमलवारच्या बालनाटय़ाला प्रथम पुरस्कार
Just Now!
X