News Flash

मोमीनपुऱ्यात युवकाचा दगडाने ठेचून खून

मोमीनपुऱ्यात राहणाऱ्या एका तरुणाचा अनोळखी आरोपींनी दगडाने डोके ठेचून खून केला. गार्ड लाईनमधील रेल्वे कॅबीनजवळ बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. ताज मोहम्मद नूर हसन अंसारी

| March 14, 2013 03:19 am

मोमीनपुऱ्यात राहणाऱ्या एका तरुणाचा अनोळखी आरोपींनी दगडाने डोके ठेचून खून केला. गार्ड लाईनमधील रेल्वे कॅबीनजवळ बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.
ताज मोहम्मद नूर हसन अंसारी (रा. डोबीनगर) हे खून झालेल्या तरुणाचे नाव असून तो टेलिफोन एक्सचेंज चौकातील एका गॅरेजमध्ये मेकॅनिक आहे. बुधवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास गार्ड लाईनमधील रेल्वे कॅबीनजवळ असलेल्या कडुनिंबाच्या झाडाखाली त्याचा मृतदेह कुणालातरी दिसला. खून झाल्याचे वाऱ्याच्या वेगाने या परिसरात पसरले. तेथे बघ्यांची गर्दी झाली.
रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा दलाचे जवान तसेच तहसील पोलीस तेथे पोहोचले. ताज मोहम्मदचे कुटुंबीय तेथे आले. त्यांनी मृतदेहाची ओळख पटविली. तहसील पोलिसांनी अनोळखी आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. ताज मोहम्मदचे डोके दगडाने ठेचले होते. त्यातून रक्तस्राव सुरू होता. पहाटे त्याचा खून झाला असावा, अशी शंका पोलिसांना आली.
या खुनामागील कारणांचा उलगडा झालेला नव्हता. ताज मोहम्मदचे वडील विणकर असून त्याला दोन भाऊ व दोन बहिणी आहेत. ताज मोहम्मद सर्वात लहान आहे. काल सायंकाळी तो नेहमीप्रमाणे कामावरून घरी आला. त्यानंतर तो फिरायला गेला. तेव्हापासून तो घरी परत आलेला नव्हता. रात्रभर तो कुठे गेला असेल या विवंचनेत असलेल्या त्याच्या कुटुंबीयांना सकाळी त्याच्या खुनाची माहिती समजली.
गेल्या काही दिवसांपासून तो मोबाईलवर बराचवेळ बोलत असायचा. त्याच्या कुटुंबीयांनी फटकारले असता तो मित्रांसह बोलत असल्याचे सांगत होता, असे पोलिसांना समजले. प्रेम प्रकरणातून तर त्याचा खून झालेला नाही ना, याचा पोलीस तपास करीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2013 3:19 am

Web Title: murdered in mominpur area
Next Stories
1 ‘रंग माझा वेगळा’ आगळावेगळा सांगीतिक महोत्सव आज
2 मेडिकलमध्ये दोन चोरटय़ांना चोप
3 भारतीय ज्ञान विज्ञानात शिल्पशास्त्राचे मोलाचे योगदान -प्रा. नेने
Just Now!
X