News Flash

विलेपार्ले येथे २४ नोव्हेंबर रोजी ‘सूर नक्षत्रांचे’

‘स्वरंगध’ आणि ‘लोकसत्ता’यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता विलेपार्ले येथील पार्ले टिळक विद्यालयाच्या प्रांगणात ‘सूर नक्षत्रांचे’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले

| November 22, 2013 08:11 am

‘स्वरंगध’ आणि ‘लोकसत्ता’यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता विलेपार्ले येथील पार्ले टिळक विद्यालयाच्या प्रांगणात ‘सूर नक्षत्रांचे’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात गायक स्वप्नील बांदोडकर, मंगेश बोरगावकर, गायिका वैशाली सामंत, बेला शेंडे, उर्मिला धनगर हे सहभागी होणार आहेत.
‘सारेगमप’चे कलाकार या संगीतसाथ करणार असून याच कार्यक्रमात संगीत क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल गझलनवाज भीमराव पांचाळे आणि हरिभाऊ विश्वनाथ आणि कंपनीचे उदय दिवाणे यांचा सत्कार केला जाणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता अभिजित खांडकेकर व अभिनेत्री स्पृहा जोशी करणार आहेत. अधिक माहितीसाठी राजन प्रभू-९३२४८०२५३२/ विद्या प्रभू-९९३०७९०६३७/राजेश चौगुले-९८२००७०९५८/सचिन लांजेवार-९८९२९९४१६९ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2013 8:11 am

Web Title: muscial program in vile parle
Next Stories
1 भावनाभडकावू संदेशांचा व्हॉट्सअ‍ॅपवर सुकाळ
2 स्त्रियांना ‘निर्भय’ करण्यासाठी ..
3 महिलांसाठी ‘बेस्ट’च बेस्ट!
Just Now!
X