भारतातील विविधांगी कलाविष्कारांचे व्यासपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘बनियान ट्री’ या संस्थेच्या वतीने संगीताच्या विविध प्रवाहांना एका तालात गुंफणाऱ्या ‘स्प्लेन्डर ऑफ मास्टर्स’ या आगळ्यावेगळया जुगलबंदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे हे पाचवे पर्व असून यावेळीही नेहरू सेंटर येथे होणाऱ्या कार्यक्रमात तरूण वादकांच्या गिटार, सतार, ड्रमच्या जुगलबंदीतून उमटणारा थरार अनुभवायला मिळणार आहे.
नेहरू सेंटरच्या सभागृहात ३० जानेवारी २०१४ रोजी ‘बनियान ट्री’च्या वतीने सायंकाळी ७  वाजता ‘स्प्लेन्डर ऑफ मास्टर्स’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात उस्ताद शुजात खान यांचे सतारवादन, प्रसन्ना यांचे गिटारवादन, न्यूयॉर्कच्या फिल मॉथरेनो यांचे ड्रम, सेल्वागणेश यांचा खंजिरा आणि अभिषेक रघुराम यांचे गायन अशी संगीताची पर्वणी असणार आहे. गेली चार वर्ष हा कार्यक्रम सातत्याने आयोजित केला जातो आहे. याच कार्यक्रमात पहिल्या वर्षी पंडित शिवकु मार शर्मा आणि उस्ताद झाकीर हुसैन यांची जुगलबंदी पहायला मिळाली होती.