मराठी नाटय़संगीतामध्ये गंधर्व नाटक मंडळी या नाटककंपनीतर्फे संगीत नाटके सादर करून आपवा अभिनय आणि गाणे याद्वारे ‘बालगंधर्व युग’ निर्माण करणारे दिग्गज नारायणराव राजहंस ऊर्फ बालगंधर्व यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीवर्षांनिमित्त त्यांना सांगितिक आदरांजली वाहण्यासाठी बोरिवली सांस्कृतिक केंद्राच्या वतीने १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता ‘तो राजहंस एक’ या दृकश्राव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बालगंधर्व यांच्या नाटकांतील त्यांची गाजलेली नाटय़पदे अतुल खांडेकर आपल्या वाद्यवृंदासह सादर करणार असून मंगला खाडिलकर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत. प्रबोधनाकर ठाकरे नाटय़गृह संकुलातील ज्ञान विहार वाचनालय, बोरिवली पश्चिम येथे हा कार्यक्रम होणार असून सर्वाना विनामूल्य प्रवेश दिला जाणार आहे.
संपर्क – २८९३६५७५.