मराठी माणसाच्या भावविश्वावर अधिराज्य गाजविणारे कवी सुरेश भट यांच्या स्मृतिदिनानिमित्त मैत्री परिवारतर्फे १४ मार्चला सायंकाळी ६.३० वाजता काचीपुरातील ‘विष्णू जी की रसोई’मध्ये त्यांना आवडणाऱ्या पदार्थाचा ‘रंग माझा वेगळा’ हा आगळावेगळा सांगीतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात सुरेश भटांच्या अजरामर झालेल्या कविता आणि गीतांसोबत त्यांना आवडणाऱ्या पदाथार्ंचा आस्वाद या रसिकांना घेता येणार आहे. कार्यक्रमाचे संगीत संयोजन सचिन ढोमणे व आनंद मास्टे यांचे असून कार्यक्रमाचे संचालन प्रकाश एदलाबादकर करणार आहेत. या कार्यक्रमात सुरभी ढोमणे, ईशा रानडे, अमर कुळकर्णी, शशी वैद्य आणि राजेश उमाळे गीते सादर करणार आहेत. विष्णू मनोहर आणि मिलिंद देशपांडे कविता सादर करतील. यावेळी रसोईमध्ये सुरेश भट यांना आवडणारे पदार्थ ठेवण्यात येणार आहे. हा कार्यक्रम रसिकांसाठी नि:शुल्क असून या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन मैत्री परिवारतर्फे करण्यात आले आहे. यानिमित्त कार्यक्रमाला आलेल्या रसिकांना भोजन सवलतीत उपलब्ध करून दिले जाणार आहे. ‘सुरमयी शाम’ आज
सुरेश भट यांच्या स्मृतिदिनानिमित्त साहित्य विहारतर्फे गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजता सायंटिफिकसभागृहात ‘सूरमयी शाम गझल प्रेमियोंको के नाम’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. अरविंद उपाध्ये यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली होणाऱ्या या कार्यक्रमात सारंग जोशी, प्रसन्न जोशी आणि मंजिरी वैद्य गीते सादर करतील. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. वेदप्रकाश मिश्रा उपस्थित राहणार आहेत.