मुलांना उन्हाळ्याच्या सुटय़ा लागणार असल्याने पालकांनी आधीच प्रवासाची योजना आखून ठेवली. त्यामुळे नागपुरातून सुटणाऱ्या व नागपूरमार्गे जाणाऱ्या सर्वच रेल्वेगाडय़ात मे महिन्यात वेटिंगची स्थिती पाहावयास मिळत आहे. उन्हाळ्याच्या सुटय़ात मुलांना पर्यटनासाठी व नातेवाईकांकडे जायला आवडते. त्यासाठी पालक आधीच तिकिटांचे आरक्षण करतात, त्यामुळे नागपुरातून सुटणाऱ्या सर्वच गेल्वेगाडय़ात संपूर्ण मे महिनाभर वेटिंगची स्थिती आहे.
मुंबईकडील गाडय़ात विदर्भ एक्सप्रेसचा एसी फर्स्ट क्लास ३ जूनपर्यंत, एसी सेकंड क्लास १७ जूनपर्यंत, एसी थर्ड क्लास २३ जूनपर्यंत आणि स्लीपर क्लास १६ जूनपर्यंत फुल्ल आहे. दुरांतो एक्सप्रेसचा एसी फर्स्ट १९ मे पर्यंत, एसी सेकंड २७ मे, एसी थर्ड २८ मे आणि स्लीपर क्लास २९ मे पर्यंत फुल्ल आहे. सेवाग्रामचा एसी फर्स्ट ३ जूनपर्यंत, एसी सेकंड ४ जूनपर्यंत आणि स्लीपर क्लास २९ मे पर्यंत वेटिंग आहे. पुण्याकडील गाडय़ात नागपूर-पुणे एक्सप्रेसमध्ये एसी फर्स्ट, सेकंड आणि स्लीपर क्लास १६ जूनपर्यंत फुल्ल आहे. नागपूर-पुणे गरीबरथही १६ जूनपर्यंत फुल्ल आहे. अमरावती-जबलपूर एक्सप्रेसमध्येही १६ मे पर्यंत वेटिंग आहे.
नागपूर-कोल्हापूर एक्सप्रेसचे सर्व कोच १० जूनपर्यंत फुल्ल आहेत. नागपूर-अहमदाबाद प्रेरणा एक्सप्रेसही जूनपर्यंत हाऊसफुल्ल आहे. नागपूर-इंदूर एक्सप्रेसमध्येही अशीच स्थिती आहे. दिल्ली मार्गावर जीटी एक्सप्रेस आणि तामिळनाडू एक्सप्रेसमध्येही जागा उपलब्ध नसल्याची सूचना मिळत आहे. दक्षिण एक्सप्रेसही २७ जूनपर्यंत फुल्ल आहे. चेन्नईकडील गाडय़ात तामिळनाडू एक्सप्रेस १७ जूनपर्यंत वेटिंग, ग्रॅण्ड ट्रंक एक्सप्रेस २४ जूनपर्यंत हाऊसफुल्ल आहे. जयपूर-मद्रास एक्सप्रेसही २६ मे पर्यंत वेटिंग आहे. बंगळुरूकडील गाडय़ात निजामुद्दीन-बंगळुरू राजधानी ३० जूनपर्यंत फुल्ल आहे. जयपूर-म्हैसूर एक्सप्रेस २६ जूनपर्यंत फुल्ल आहे. संघमित्रा एक्सप्रेसमध्येही २३ जूनपर्यंत वोटिंग आहे. हैदराबादकडे जाणाऱ्या गाडय़ात आंध्रप्रदेश एक्सप्रेस २७ मे पर्यंत वेटिंग आहे. दक्षिण एक्सप्रेसमध्येही २६ जूनपर्यंत वेटिंग असून पटना-सिकंदराबाद एक्सप्रेसही १३ जूनपर्यंत फुल्ल आहे. हावडाकडील गाडय़ात गीतांजली एक्सप्रेसमध्ये जागा उपलब्ध नसून आझाद हिंद एक्सप्रेसही २९ जूनपर्यंत फुल्ल आहे.
एलटीटी-हावडा ज्ञानेश्वरी एक्सप्रेस २४ जूनपर्यंत वेटिंगवर आहे. जयपूरकडे जाणाऱ्या गाडय़ात जयपूर एक्सप्रेस जुलै महिन्यापर्यंत, नागपूर-सिकंदराबाद एक्सप्रेस १७ जूनपर्यंत वेटिंगवर आहे. एकंदरीत सर्वच दिशांना जाणाऱ्या रेल्वेगाडय़ात मे महिनाभर वेटिंग आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 14, 2014 8:08 am