News Flash

ठेवीदारांना सहकार्याचे माजी संचालकांचे आवाहन

नाशिक र्मचट बँकेवर (नामको) प्रशासक नियुक्त करण्यात आल्यामुळे संभ्रमित झालेल्या ग्राहकांनी बँकेतून पैसे परत घेण्यास सुरूवात केल्यानंतर बँकेच्या

| January 9, 2014 07:52 am

नाशिक र्मचट बँकेवर (नामको) प्रशासक नियुक्त करण्यात आल्यामुळे संभ्रमित झालेल्या ग्राहकांनी बँकेतून पैसे परत घेण्यास सुरूवात केल्यानंतर बँकेच्या वतीने तसेच माजी संचालकांच्या वतीने बँकेची आर्थिक परिस्थिती उत्तम असल्याचे सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे नाशिक जिल्हा ग्राहक पंचायतीने बँकेवर अशी परिस्थिती ज्यांच्यामुळे ओढवली त्यांच्याविरूध्द कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
आर्थिक अनियमिततेमुळे नामकोवर प्रशासक नियुक्त करण्याच्या निर्णयाचे ग्राहक पंचायतीतर्फे स्वागत केले आहे. यापूर्वीही हुकूमचंद बागमार यांनी काही कोटी रुपयांचा साखर घोटाळा केला होता. तरीही त्यांना र्मचट बँकेचे प्रमुख म्हणून संचालकांनी कसे कायम ठेवले, याबद्दल ग्राहक पंचायतीने आश्चर्य व्यक्त केले आहे. र्मचट बँकेत निवृत्तीधारकांनी ठेवलेल्या ठेवींचे आपल्या नातेवाईकांना तसेच आप्तेष्टांना बेकायदेशीररित्या बागमार व सर्व संचालकांनी संगनमताने वाटप केले. त्यामुळेच बँकेवर ही वेळ आली. सर्व दोषी संचालकांवर त्वरित प्रशासकांनी फौजदारी कारवाई करावी तसेच बनावट कर्जाची सक्तीने वसुली करावी अशी मागणीही ग्राहक पंचायतीने केली आहे. जर बँकेतून ठेवींची संपूर्ण रक्कम देण्यास मनाई करण्यात येत असेल तर ग्राहक संरक्षण कायद्यानुसार ग्राहक न्यायमंचातून आदेश घेऊन पैसे काढू शकतात, असे ग्राहक पंचायतीतर्फे विलास देवळे, अनिल नांदोडे, कृष्णा गडकरी, नितीन घाटे यांनी सुचविले आहे.
दुसरीकडे ठेवीदार व खातेदारांनी बँकेतून सर्व पैसे काढून घेतल्यास बँक अडचणीत येऊ शकत असल्याचे पाहून काही माजी संचालक व पदाधिकाऱ्यांनी ठेवीदारांना ठेवी काढू नयेत असे आवाहन केले आहे. रिझव्‍‌र्हे बँकेने कोणतेही आर्थिक र्निबध लादलेले नाहीत. सर्व व्यवहार सुरळीत असून ते पारदर्शकच राहतील. प्रशासक नियुक्तीमुळे ठेवीदारांनी घाबरण्याचे कारण नाही. बँकेची आर्थिक स्थिती भक्कम असून केवळ हुकूमचंद बागमार व त्यांचे काही सहकारी संचालक यांनी व्यक्तीगत स्वार्थासाठी बँकेचा वापर केला. तो सर्व व्यवहार रिझव्‍‌र्ह बँकेने बेकायदेशीर ठरविला आहे. बँकेचे काही हितशत्रू एसएमएसव्दारे चुकीची माहिती खातेदारांपर्यंत पोहचवित असल्याचा आरोपही माजी संचालकांनी केला आहे. खातेदार व ठेवीदारांनी अफवांवर विश्वास न ठेवता बँकेस सहकार्य करण्याचे आवाहन गजानन शेलार, ललितकुमार मोदी, भास्कर कोठावदे, सुनील बोडके, प्रकाशचंद्र भुतडा, हेमंत अस्वले, सुनील बूब, अजय ब्रम्हेचा आदिंनी केले आहे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 9, 2014 7:52 am

Web Title: namco former director gives assurance to depositors
Next Stories
1 ‘नामको’ समोर रीघ..
2 ..मामाही थांबला!
3 तलावात बुडवून दोघांची हत्या
Just Now!
X