03 August 2020

News Flash

‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे भवन’

महापालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे उद्या (दि.२३) ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे भवन’ असे नामकरण होत आहे. भास्करगिरी महाराज व जंगलेशास्त्री महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी ५ वाजता

| January 23, 2013 03:25 am

महापालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे उद्या (दि.२३) ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे भवन’ असे नामकरण होत आहे. भास्करगिरी महाराज व जंगलेशास्त्री महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी ५ वाजता हा कार्यक्रम होईल.
बाळासाहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून हा कार्यक्रम घेण्यात आला आहे. नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी सेनाप्रमुख ठाकरे हयात असतानाच त्यांचे नाव या इमारतीला द्यावे, असा प्रस्ताव मनपाला दिला होता. महापौर शीला शिंदे, आयुक्त विजय कुलकर्णी, तसेच महापालिकेचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित असतील. आमदार अनिल राठोड, तसेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे पक्षाच्या बैठकीसाठी उद्याच मुंबईत असल्याने ते या कार्यक्रमाला नसतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2013 3:25 am

Web Title: naming ceremony of balasaheb thackeray bhavan today
Next Stories
1 भारतात भ्रष्टाचाराची झळ सामान्यांनाच- हजारे
2 विचित्र अपघातात रिक्षाचालक ठार
3 जिल्हा नियोजन समितीवर पाचजण बिनविरोध
Just Now!
X