19 September 2020

News Flash

नांगलडॅम-नांदेड अतिवेगवान साप्ताहिक रेल्वेस गुरुवारी प्रारंभ

सन २०१३-१४च्या रेल्वे अंदाजपत्रकात घोषित नांगलडॅम-नांदेड अतिवेगवान साप्ताहिक रेल्वेचा प्रारंभ गुरुवारी (दि. ३) सायंकाळी ७ वाजता नांगलडॅम येथून माजी रेल्वेमंत्री पवनकुमार यांच्या हस्ते होणार आहे.

| October 1, 2013 01:57 am

सन २०१३-१४च्या रेल्वे अंदाजपत्रकात घोषित नांगलडॅम-नांदेड अतिवेगवान साप्ताहिक रेल्वेचा प्रारंभ गुरुवारी (दि. ३) सायंकाळी ७ वाजता नांगलडॅम येथून माजी रेल्वेमंत्री पवनकुमार यांच्या हस्ते होणार आहे. ही रेल्वे आठवडय़ातून एकदा कायमस्वरूपी धावणार आहे. रेल्वेत एक सेकंड एसी, दोन थर्ड एसी, चार स्लीपर, सहा जनरल व दोन महिला गार्डसहित १५ डब्यांची सुविधा राहणार आहे.
गाडी क्र. २२४५८ नांगलडॅम-नांदेड सुपरफास्ट रेल्वे नांगलडॅम येथून दर गुरुवारी दुपारी ४ वाजून २० मिनिटांनी निघून चंडीगड, अंबाला, पानिपत, नई दिल्ली, मथुरा, आग्रा, ग्वाल्हेर, झासी, बीना, भोपाळ, हबीबगंज, इतारसी, खंडवा स्थानकांवरून अकोला येथे दर शुक्रवारी सायंकाळी ७ वाजून १० मिनिटांनी, वाशीम रात्री ८.३०, िहगोली ९.१०, वसमत १०, पूर्णा १०.४० व अखेर नांदेड येथे मध्यरात्री ११.४५ वाजता पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात ही गाडी (क्र. २२४५७) नांदेड-नांगलडॅम अतिवेगवान येथून शनिवारी सकाळी ११ वाजता निघून पूर्णा ११.४०, वसमत दुपारी १२.२०, िहगोली १, वाशीम १.५०, अकोला ३.५०, पुढे मार्गाने नई दिल्ली येथे दुपारी १.२५, चंदिगड येथे सायंकाळी ६, आणि अखेर नांगलडॅम येथे दर रविवारी रात्री ८.२५ वाजता पोहोचणार आहे. या रेल्वेने मराठवाडा व विदर्भातील भाविक-पर्यटकांना प्रथमच चामुंडादेवी, ज्वालादेवी, आंनदपूरसाहिब, सिमला, कुलू, मनाली तसेच हिमाचल प्रदेशातील अनेक पर्यटनस्थळांना जाण्याची सोय होणार आहे. मात्र, या रेल्वेला कुरुक्षेत्र स्थानकावर थांबा दिला नाही. हा थांबा द्यावा, सोबत या रेल्वेला ऊना-अबमदुरा-तलवारा दरम्यान नवीन रेल्वेमार्ग पूर्णत्वास आल्यावर चक्कीबांक, पठाणकोट माग्रे जम्मूतावीपर्यंत वाढविण्याची मागणी परभणी येथून अरुण मेघराज, राजेंद्र मुंढे, रवींद्र मुथा, अॅड. माधुरी क्षीरसागर, श्रीकांत गडप्पा, कृष्णा अग्रवाल, प्रवीण थानवी आदींनी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 1, 2013 1:57 am

Web Title: nangaldam nanded superfast express train starts on thursday
Next Stories
1 पवारांना आता मंत्रिपदही मिळणार नाही- मुंडे
2 ‘डी’ म्हणजे दर्डा गँग!
3 ‘सत्य साईबाबांचे स्तोम हाही भ्रष्टाचारच’!
Just Now!
X