नरक्याची तस्करी करणा-या पाचजणांच्या टोळक्याला गुरुवारी करवीर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून सव्वापाच लाख रुपये किमतीच्या नरक्या वनस्पतीसह पावणेआठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सर्जेराव श्रीपती सुतार (वय २२), सागर आनंदा केसरकर (वय २२), किशोर बळवंत पताडे (वय २५), धाकलू भागू पटकारे (रा. सर्व. राधानगरी तालुका), सागर बाळू धुमाळ (वय २६) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.    
परिते ते ठिकपुर्ली रोडवर परिते गावच्या हद्दीमध्ये एक क्रशर आहे. तेथे उपरोक्त आरोपी नरक्या वनस्पतीची लाकडे विनापरवाना आणून तिची बेकायदेशीर वाहतूक करीत होते. ही माहिती करवीर पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तेथे धाड टाकली. पोलिसांनी सहाजणांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर भारतीय वनअधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला.     
आरोपींकडून ७ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यामध्ये १२८५ किलो नरक्या वनस्पती, महिंद्रा मॅक्स कंपनीची पिकअप व्हॅन, दोन दुचाकी, तीन मोबाइल आदींचा समावेश होता. याबाबत पोलीस नाईक संजय गोविंद जाधव यांनी करवीर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. धाकलू भागू पटकारे हा आरोपी फरारी आहे.

Abhishek Ghosalkar, murder,
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण : एकापेक्षा जास्त व्यक्तींच्या सहभागाच्या दृष्टीने तपास केला का ? उच्च न्यायालयाची पोलिसांना विचारणा
Nandurbar, Heena Gavit,
नंदुरबारमध्ये डॉ. हिना गावित यांच्यासमोर स्वपक्षीय, मित्रपक्षांच्या नाराजीचे आव्हान
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?
Loksatta anvyarth wheat rates Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana to Central Government
अन्वयार्थ: गव्हाचा सरकारी तिढा!