03 August 2020

News Flash

मोदी व अडवाणींवर काँग्रेसच्या सहप्रभारींचा हल्लाबोल

काँग्रेसमध्ये अलीकडच्या काळात लक्षणिय बदल झाले आहेत. आर्थिक ताकतीच्या जोरावर वरचष्मा राखू पाहणाऱ्यांचे युग संपुष्टात आले आहे.

| October 26, 2013 06:22 am

काँग्रेसमध्ये अलीकडच्या काळात लक्षणिय बदल झाले आहेत. आर्थिक ताकतीच्या जोरावर वरचष्मा राखू पाहणाऱ्यांचे युग संपुष्टात आले आहे. राहुल गांधी यांनी पक्षाची धुरा सांभाळल्यानंतर पक्षासाठी प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्यांना न्याय मिळत आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा राज्याचे सहप्रभारी श्यौराज वाल्मिकी यांनी केले. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी व लालकृष्ण अडवाणी यांच्यावर अतिशय कठोर शब्दात टीकास्त्र सोडले. विरोधकांना पराभूत करण्यासाठी काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी संपुष्टात आणावी, असे आवाहन त्यांनी केले.
नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे येथे आयोजित आजी-माजी पदाधिकारी व लोकप्रतिनिधींच्या मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी आ. माणिक कोकाटे, माजीमंत्री डॉ. शोभा बच्छाव, विजय नवल पाटील, जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे आदी उपस्थित होते. काँग्रेसने स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात देशासाठी महत्वपूर्ण योगदान दिले असल्याचे वाल्मिकी यांनी नमूद केले. लालकृष्ण अडवाणी यांनी कधीकाळी नरेंद्र मोदी यांना पुढे आणले. परंतु, आज हेच मोदी त्यांच्यासाठी भस्मासूर ठरले आहेत.
भाजप सत्तेवर आल्यास देश कित्येक दशके पुन्हा मागे जाईल. अडवाणी व मोदी यांच्यासाठी त्यांनी अतिशय कठोर शब्दांचा प्रयोग केला. भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेसजनांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. पक्षांतर्गत गटबाजीला कोणी थारा देऊ नये, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी बोलण्याच्या ओघात वाल्मिकी यांनी आपला राजकीय प्रवास कथन केला. तेव्हा यापूर्वी चमचेगिरी करणाऱ्यांना तिकीटे दिली जात होती.
संघर्ष करून उभ्या राहणाऱ्याला तिकीट मिळत नव्हते. परंतु, आता परिस्थिती पूर्णपणे बदलल्याचे सांगत त्यांनी काँग्रेसमध्ये राहुल युग सुरू झाल्याचे नमूद केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2013 6:22 am

Web Title: nashik congress slams advani and narendra modi
Next Stories
1 पारगमन शुल्काच्या वादावर आता सर्वसाधारण सभेत तोडगा
2 दरोडेखोरांची टोळी जेरबंद
3 कन्या छात्रालयाच्या सचिवाविरुद्ध गुन्हा
Just Now!
X