सर्वेश पाटील, वैष्णवी शिंदे, तन्मय कर्णीक, ईशा कुलकर्णी, शिवम गडाख, स्वामिनी शेटय़े यांनी नाशिक जिल्हा जम्परोप संघटनेच्या वतीने आयोजित वरिष्ठ गट जिल्हा स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले.
विजेत्यांना शाळेच्या मुख्याध्यापिका रिना बिस्वास, पर्यवेक्षिका तारा पै, अशोक खैरनार, सुरेखा पाटील, विक्रम दुधारे, भाविक भिडे आदीेंच्या प्रमुख उपस्थितीत गौरविण्यात आले. स्पर्धेचा निकाल- ३० सेकंद स्पीड प्रकारात सर्वेश पाटील (सुवर्ण), अपूर्व म्हस्के (रौप्य), भावेश जाधव (कांस्य), मुलींमध्ये वैष्णवी शिंदे (सुवर्ण), अरुंधती काकडे (रौप्य), रेणुका शुक्ला (कांस्य) डबल अंडर प्रकारात तन्मय कर्णिक (सुवर्ण), संकेत परदेशी व अनिमेश भावसार (रौप्य), देवदत्त येवले (कांस्य), मुलींमध्ये ईशा कुलकर्णी (सुवर्ण), सोनाली वाघ (रौप्य), निकीता मेहतानी (कांस्य), तीन मिनीट इन्डोरन्स प्रकारात शिवम गडाख (सुवर्ण), शंतनू पाटील (रौप्य), शुभम अनामडे व अमन शेख (कांस्य), मुलींमध्ये स्वामिनी शेटय़े (सुवर्ण), देवयानी येवले (रौप्य), अरुंधती देशमुख व वैभवी कौरगी (कांस्य) यांचा समावेश आहे.
सारडा कन्या शाळेत क्रीडा महोत्सव
नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या सारडा कन्या शाळेत वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन मुख्याध्यापिका सरोजिनी तारापूरकर यांच्या उपस्थितीत झाले. शरीर व मन सुदृढतेसाठी व्ययामाची आवश्यकता असून त्यासाठी शालेय पातळीवरील स्पर्धामध्ये उत्स्फूर्तपणे भाग घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
उपमुख्याध्यापक रमण ओस्तवाल, शिक्षक प्रतिनिधी अतुल करंजे, पर्यवेक्षिका प्रमिला पाटील आदी उपस्थित होते. यावेळी राज्यस्तरीय जलतरणपटू पूजा धर्मशाळे, विद्या लोहार, मंजिरी तावडे आदींनी क्रीडा ज्योतीचे स्वागत केले.
 ऋचा मोंढेने शपथ दिली. क्रीडा शिक्षक मुक्ता सप्रे, सुनीता कासार, हेमंत जाणवे, अमोल जोशी आदींचे सहकार्य आहे. उपस्थितांचा परिचय पुंडलिक शेंडे यांनी करून दिला.
सूत्रसंचालन सुनीता कासार यांनी केले. आभार शिक्षक प्रतिनिधी अतुल करंजे यांनी मानले.
मुक्त विद्यापीठाच्या क्रीडा स्पर्धा
नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विभागीय क्रीडा स्पर्धा केटीएचएम महाविद्यालयाच्या मैदानावर झाल्या. कबड्डी, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, लांब उडी अशा विविध १४ मैदानी खेळांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. वैयक्तीक १९ तर सांघिक स्पर्धेसाठी ४१ खेळाडूंची केंद्रीय क्रीडा महोत्सवासाठी निवड करण्यात आली. विद्यापीठाने ११ विविध विभागीय केंद्रावर अशाच पद्धतीने क्रीडा स्पर्धा घेण्यास सुरूवात केली असून २६, २७ डिसेंबर रोजी विभागीय स्पर्धातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांची केंद्रीय क्रीडा महोत्सवासाठी निवड करण्यात येणार आहे. अंतीम स्पर्धामधून निवड झालेले विद्यार्थी १७ जानेवारीला नागपूर येथे होणाऱ्या आंतरविद्यापीठीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होतील.
केटीएचएम महाविद्यालयाच्या मैदानावर क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रकाश अतकरे, प्राचार्य दिलीप धोंडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
यावेळी विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक शाम पाडेकर, संतोष साबळे, रामनाथ मालुंजकर, अमोल पाटील आदी उपस्थित होते.
 या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्रीडा शिक्षक-प्रशिक्षक शरद पाटील, अविनाश कदम, अशोक जाधव, संजय मालसाने, कैलास लवांड यांनी विशेष परीश्रम घेतले. सूत्रसंचालन कक्ष अधिकारी तनुजा कुलकर्णी यांनी केले.
विभागीय केंद्र संचालक पी. एस. मुसळे यांनी प्रास्तविक केले. रामनाथ मालुंजकर यांनी आभार मानले.