काटेरी मुकूट
Untitled-1खासदार – डॉ. हीना गावित (भाजप)
मोदी लाटेत काँग्रेसचा बुरुज असलेल्या नंदुरबार मतदार संघावर भाजपचा झेंडा फडकवत डॉ. हिना गावित खासदार झाल्या. राजकारणात नव्याने केलेला प्रवेश, स्थानिक पातळीवरील पक्षांतर्गत बंडाळी, भौगोलिक परिस्थिती पाहता खासदारकीचे पहिले वर्ष त्यांच्यासाठी काटेरी मुकूट ठरले. मात्र उच्च शिक्षण, दांडगा जनसंपर्क आणि मतदार संघाचा कायापालट करण्याची धडपड या जोरावर मतदारांच्या नाराजीवर फूंकर मारण्यात त्या यशस्वी ठरत आहेत. तरीही प्रचारात खुद्द पंतप्रधान मोदी यांनी सभा घेऊन दिलेल्या आश्वासनांपासून अद्याप मतदारसंघ कोसो दूर असल्याचे दिसते. रोजगार, स्थलांतर, आरोग्यासह मूलभूत सुविधांचा वानवा यावर मात करण्यात खासदारांना यश आलेले नाही. राष्ट्रवादीतुन आपल्या वडिलांसह भाजपमध्ये दाखल झालेल्या डॉ. हिना गावित यांना भाजपमधील मूळ गटाच्या नाराजीलाही वर्षभर सामोरे जावे लागले. अतिदुर्गम भागात ११ रस्ते, २०० कूपनलिका, सूरत-अमरावती महामार्गाच्या चौपदरीकरणास मान्यता अशी काही कामे मार्गी लावण्यात त्यांना यश आले आहे.केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
४० टक्के कामे मार्गी
डॉक्टर असल्याने प्रत्येक कामकाज नियोजनद्वारे करण्याची सवय. नंदुरबार मतदार संघाच्या वर्षभराच्या कामाचे नियोजन अशाच पध्दतीने केले होते. मात्र त्यातील केवळ ४० टक्केच कामे मार्गी लागल्याने वर्षभरातील कामकाजाबद्दल असमाधानी आहे. या व्यवस्थेतील कामकाजाचा अनुभव नव्हता. मात्र आता त्याची व्याप्ती समजल्याने आगामी चार वर्षांच्या काळात मतदार संघात भरीव कामे होतील. मात्र यंत्रणेतील ढिसाळपणा पाहता बदल होण्याची गरज आहे. मानव विकास निर्देशांकात सातत्याने शेवटच्या क्रमांकावर असलेल्या या मतदारसंघाचा क्रमांक बदलायचा आहे.
श्रेय लाटण्याचा प्रयत्न
-माणिकराव गावित, काँग्रेस

वर्षभरानंतर मोदी सरकार हे केवळ पोकळ आश्वासनांचे घर ठरले आहे. नंदुरबारच्या खासदारांनी वर्षभरात काहीच कामकाज केलेले नाही. उलट युपीए सरकारच्या कार्यकाळात मंजूर झालेली अनेक कामे आणि योजनांचे पुन्हा भूमिपूजनाद्वारे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न त्यांनी केला. वर्षभरात केंद्राच्या अनेक योजनांचा निधी आदिवासीबहुल जिल्ह्य़ांना मिळु शकलेला नाही. या मतदार संघावर अन्याय करण्याचे काम भाजप सरकारने केले आहे.
-नीलेश पवार

Untitled-1जनसंपर्काची कमतरता
खासदार – डॉ. सुभाष भामरे (भाजप)
‘स्मार्ट सिटी’साठी प्रयत्न
वर्षभरात अधिकाधिक कामे कशी होतील यासाठी प्रयत्नांची शिकस्त. प्रलंबित मनमाड-इंदूर रेल्वे मार्ग दोन वर्षांत पूर्णत्वास नेण्यासाठी पाठपुरावा. मुंबईसाठी धुळ्याहून स्वतंत्र १२ डब्यांची रेल्वे सुरु केली. पुण्याला जाण्यासाठी एका स्वतंत्र रेल्वेची सोय करण्यात येईल. दिल्ली-मुंबई कॉरिडॉर, सिंचन प्रकल्प हेही कार्यक्रम पत्रिकेवर असून काही निर्णय घेण्यात आले आहेत. मालेगाव, बागलाणसह शिंदखेडा, नरडाणा व दोंडाईचा आदी भागात रोजगार निर्मितीसाठी कारखानदारी वाढविण्याचा प्रयत्न आहे. हरणबारी धरणाच्या उजव्या-डाव्या कालव्याचे प्रश्न मार्गी लावले जातील. ‘स्मार्ट सिटी’ संकल्पनेत धुळे आणि मालेगाव या दोन शहरांचा समावेश केला जाणार असून त्याचे निकष लवकर पूर्ण करण्यात येईल.
धुळे आणि नाशिक या दोन जिल्ह्य़ांमध्ये विभागल्या गेलेल्या या मतदारसंघातील प्रश्न व समस्या वेगवेगळ्या आहेत. मतदारसंघातील रखडलेले प्रश्न सोडविण्यासाठी भामरे यांचे प्रयत्न सुरू आहेत.  प्रदीर्घ काळापासून रडलेल्या मनमाड-मालेगाव-धुळे-इंदूर या बहुचर्चित रेल्वे मार्गासाठी काही तरतूद अर्थसंकल्पात झाली आहे. मालेगाव, सटाणा, बागलाण यांसारख्या शहरी आणि ग्रामीण भागातील सिंचनाच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी केंद्र व राज्य शासनातील अधिकाऱ्यांशी त्यांचे बैठकसत्र सुरू आहे. धुळे-मुंबई ही आठवडय़ातून एकदा रेल्वेगाडी सुरू झाली. खासदारांनी आपल्या लोकसभा मतदार संघात येणाऱ्या मालेगाव शहर व बागलाणचा भाग आणि धुळे धुळे शहर व ग्रामिण आणि शिंदखेडा या परिसरात हवा त्या प्रमाणात जनसंपर्क ठेवलेला
दिसत नाही.
प्रश्न मार्गी लागले नाहीत
– अमरिशभाई पटेल, काँग्रेस<br />केवळ एका वर्षांत नव्या लोकप्रतिनिधीकडून ढिगभर अपेक्षा करणेच चुकीचे आहे. खरेतर सध्या देशाची आर्थिक स्थिती चांगली नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे मतदार संघातील विविध प्रश्न आणि मागण्या, समस्या सोडविणे खरोखर जिकिरीचे वाटते. वाढत्या लोकसंख्येचा अप्रत्यक्ष परिणाम त्या त्या भागातील विकासांवर होतो हे मान्यच करावे लागेल. या स्थितीत धुळे लोकसभा मतदार संघातील रखडलेली कामे कशी मार्गी लागतील याचे प्रयत्न करणे कसोटीचे ठरणार आहे.     
ल्ल संतोष मासोळे