पाऊस नसल्याने उद्भवलेल्या टंचाईचे गांभीर्य लक्षात घेऊन येथील वर्ल्ड ऑफ स्पोर्टस् शिक्षण सांस्कृतिक संस्था आणि ‘डेकॅथलॉन’ यांच्या वतीने येथे पाणी वाचविण्याचा संदेश देण्यासाठी आयोजित दौडमध्ये नाशिककरांनी मोठय़ा संख्येने सहभाग घेतला.
गोल्फ क्लबजवळील चौकापासून सकाळी साडेसात वाजता दौडला सुरूवात झाली. बांधकाम व्यावसायिकांची संघटना असलेल्या क्रेडाईचे माजी अध्यक्ष व निसर्गप्रेमी किरण चव्हाण, नंदू देसाई यांच्या हस्ते दौडला हिरवा झेंडा दाखविण्यात आला.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र निंबाळते, भाऊसाहेब पाटील, संजय शिंदे, अनिल उगले आदी उपस्थित होते.  गोल्फ क्लब टिळकवाडी वावरे चौक, सीबीएस, त्र्यंबक नाकामार्गे गोल्फ क्लब येथे दौडचा समारोप झाला. दौडमध्ये सहभागी सर्व धावपटूंना डेकॅथलॉनतर्फे प्रत्येकी १०० रुपयांचे सवलतीचे कुपन देण्यात आले. तसेच सोडत काढून सहा सहभागींना प्रत्येकी ५०० रुपयांचे रोख बक्षिस देण्यात आले. बक्षिस समारंभास सागर बोंडे, भगवान काळे, चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते.