News Flash

नाशिकच्या युवकाचा शोधनिबंध आंतरराष्ट्रीय मासिकात

सौर उर्जेसंदर्भात आंतरराष्ट्रीय पातळीवर जनजागृतीसाठी प्रयत्न करणाऱ्या ‘सोलर एनर्जी’ या मासिकात येथील प्रसाद ठाकूर यांचा ‘सोलर सेल’ विषयावरील शोधनिबंध प्रसिध्द झाला आहे.

| September 28, 2013 07:23 am

सौर उर्जेसंदर्भात आंतरराष्ट्रीय पातळीवर जनजागृतीसाठी प्रयत्न करणाऱ्या ‘सोलर एनर्जी’ या मासिकात येथील प्रसाद ठाकूर यांचा ‘सोलर सेल’ विषयावरील शोधनिबंध प्रसिध्द झाला आहे. सौर उर्जेसंदर्भात संशोधन करणाऱ्या जगभरातील संशोधकांमध्ये हे मासिक प्रसिद्ध आहे.
‘सोलर एनर्जी’ हे ‘इंटरनॅशनल सोलर एनर्जी सोसायटी’ चे अधिकृत मासिक असून त्यात जगभरातील महत्वपूर्ण संशोधनाची माहिती व आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त तज्ज्ञांचे लेख प्रसिद्ध होत असतात. या मासिकाची ९६ वी आवृत्ती ऑक्टोबर २०१३ मध्ये प्रसिद्ध होत असून, या आवृत्तीमध्ये या शोधनिबंधाचा समावेश करण्यात आला आहे. या शोधनिबंधामध्ये कमी किंमतीच्या व उच्च कार्यक्षमता असलेल्या ‘सोलर सेल’च्या रचनेविषयी माहिती देण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2013 7:23 am

Web Title: nashik young boys essay in international magazine
टॅग : Nashik
Next Stories
1 महावितरण नाशिक विभागात १५० कोटींची गुंतवणूक करणार
2 पाच तालुक्यात पाऊस जेमतेमच
3 वन विभागाच्या भात्यात ‘न्युमॅटीक ट्रॅक्विलायझर गन’
Just Now!
X