अभिजात भारतीय संगीताचा वेध घेतानाच आधुनिक तंत्रज्ञानाच्या कसोटीवर संगीताच्या वाटचालीचा धांडोळा संगीतविषयक राष्ट्रीय चर्चासत्रात घेतला जाणार असून प्रथमच मान्यवरांच्या चिंतनपर भाष्याने संगीतविषयक हालचालींना टिपणारे हे आयोजन १ ऑक्टोबरला करण्यात आले आहे.
यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेच्या यशवंत कला महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी पर्वावर आयोजित संगीत विषयाच्या या राष्ट्रीय चर्चासत्रास विद्यापीठ अनुदान आयोगाने पुरस्कृत केले आहे. २१ व्या शतकात आधुनिक तंत्रज्ञान व जागतिकीकरणाने सर्वच क्षेत्राला व्यापले असून संगीत शाखेवरही त्याचा प्रभाव पडला आहे. भारतीय संगीत वेगवेगळया वाटा चोखाळत असून एका नव्या उंचीवर ते पोहोचले आहे. यापूर्वीही संगीताचे प्रवाह बदलले असले तरी विद्यमान काळातील बदलांची आमुलाग्रता यापूर्वी दिसून आलेली नाही. त्याचाच धांडोळा घेण्याचा प्रयत्न, २१ व्या शतकातील भारतीय संगीताची शिखरे, या विषयावरील चर्चासत्रात होणार आहे, असे संगीत विभाग प्रमुख प्रा. अरुणा हरले यांनी याविषयी  नमूद केले.
महाविद्यालयाच्या छात्रालय सभागृहात १ ऑक्टोबरला सकाळी ९ वाजता संस्थाध्यक्ष आमदार प्रा. सुरेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटनचा कार्यक्रम असून ‘रातुम’ नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. महेशकुमार येंकी, खरागडच्या इंदिरा कला विश्वविद्यालयाचे संगीततज्ज्ञ डॉ. अनिल ब्योहार व कला शाखेच्या अधिष्ठाता डॉ. शरयू तायवाडे यांची प्रमुख उपस्थिती राहील. चर्चासत्रात भारतीय व पाश्चात्य संगीतातून झालेली नवनिर्मिती, भारतीय संगीत व संगणक, भारतीय संगीताची समीक्षा आधुनिक युगातील संगीतविषयक बदल तसेच संगीत: रोगावरील एक उपचारपध्दती या विषयावर निबंध वाचन होईल. यामध्ये बिंझाणी महाविद्यालयाच्या प्राचार्य स्नेहल पाळधीकर, इंदोरच्या शासकीय स्वायत्त महाविद्यालयाच्या डॉ. बागेश्री जोशी, एल. ए. डी.महाविद्यालयातील संगीत विभाग प्रमुख डॉ. चित्रा मोडक, पुणे येथील एसएनडीटीच्या संगीत विभागप्रमुख डॉ. पुर्णिमा धुमाळे तसेच डॉ. अनिरुध्द खरे (अकोला) यांची मुख्य भाषणे होणार आहेत.
समारोपाच्या सत्रास आयोजक प्राचार्य डॉ. विलास देशमुख व उच्च शिक्षण विभागाचे माजी सहसंचालक डॉ.बी.बी. चौधरी हे मुख्य अतिथी राहतील. संगीतक्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या या चर्चासत्राची रूपरेषा डॉ. चित्रा मोडक (नागपूर), डॉ. व्ही.आर. बोबडे, प्रा. तारा विलायची व डॉ. यू. बी. पारेकर (वर्धा), डॉ. वर्षां कुळकर्णी (यवतमाळ), डॉ. अर्चना अंभोरे (अकोला), प्रा.अभय गद्रे (खामगाव) या मान्यवरांनी तयार केली आहे. नोंदणी शुल्क पाचशे रुपये असून संगीत शाखेच्या विद्यार्थ्यांना सवलत देण्यात आली आहे. समारोपप्रसंगी शोधनिबंधांच्या पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा होणार आहे. संगीतक्षेत्रात महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या या चर्चासत्रात सहभागी होणाऱ्या इच्छुकांनी प्रा. अरुणा हरले (९०९६४७६००, ८३९०३९३४०५) यांच्याशी संपर्क साधण्याची सूचना प्राचार्य डॉ. देशमुख यांनी केली आहे.

loksatta readers reactions loksatta readers opinions loksatta readers response
लोकमानस : श्रमिक ऊर्जा भांडवलाइतकीच महत्त्वाची
documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
Loksatta kutuhal Limitations of learning
कुतूहल: सखोल शिक्षणाच्या मर्यादा
ग्रामविकासाची कहाणी