औरंगाबाद विभागीय क्रीडा संकुल कार्यकारी समिती व जिल्हा क्रीडा परिषद यांच्या वतीने ५८ व्या राष्ट्रीय शालेय कबड्डी स्पर्धा १४ ते १८ फेब्रुवारीदरम्यान विभागीय क्रीडा संकुल समिती येथे आयोजित करण्यात आल्या आहेत.
जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात स्पर्धेच्या आयोजनाबाबत नियोजन बैठक झाली.
पोलीस अधीक्षक ईशु सिंधू, क्रीडा उपसंचालक सी. आर. कांबळे, जिल्हा क्रीडा अधिकारी तनसुख झांबड, क्रीडा संघटनेचे प्रतिनिधी व क्रीडा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी विक्रमकुमार म्हणाले की, जीवनात खेळाचे महत्त्व अनन्यसाधारण असून कबड्डी व खो-खो सारख्या खेळांना अधिक प्रोत्साहन देण्याची गरज आहे. राष्ट्रीय शालेय कबड्डी स्पर्धेच्या आयोजनासंदर्भात विविध समित्या व विभागांनी समन्वय राखून काम करावे व स्पर्धा यशस्वी कराव्यात.