02 December 2020

News Flash

नैसर्गिकरीत्या पिकवलेले आंबेच विक्रीस ठेवावेत

आंबा कृत्रिमरीत्या पिकविण्यासाठी कार्बाईड पावडर व त्याच्या पिशव्यांचा वापर न करता तो नैसर्गिकरीत्या पिकवून बाजारपेठेत ग्राहकांना उपलबध करून द्यावा असे आवाहन सातारचे अन्न व औषध

| April 27, 2013 01:04 am

आंबा कृत्रिमरीत्या पिकविण्यासाठी कार्बाईड पावडर व त्याच्या पिशव्यांचा वापर न करता तो नैसर्गिकरीत्या पिकवून बाजारपेठेत ग्राहकांना उपलबध करून द्यावा असे आवाहन सातारचे अन्न व औषध विभागाचे सहायक आयुक्त संपतराव देशमुख यांनी कराड येथे फाळांच्या व्यापाऱ्यांना केले. येथील शामराव पाटील फळे, फुले व भाजीपाला मार्केटमध्ये घेण्यात आलेल्या फळांच्या व्यापाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. अन्नसुरक्षा अधिकारी आर. एस. बोडके, अन्न सुरक्षा अधिकारी रणजित पवार यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यासह फळव्यापारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
संपतराव देशमुख म्हणाले की, सध्या बाजारपेठेत आंब्याची आवक वाढली आहे. ग्राहकांची मागणी वाढली असल्याने व्यापाऱ्यांनी ग्राहकांना नैसर्गिकरीत्या पिकवलेले आंबे विक्रीस ठेवावेत. आंबा पिकविण्यासाठी कार्बाईड पावडर तसेच त्याच्या पिशव्यांचा वापर करू नये. गवत, भाताचा पेंडा आदींद्वारे आंबे पिकवले जावेत. शक्य झाल्यास आंबे पिकविण्यासाठी रॅपिंग चेंबर्सचा वापर करावा. यावेळी काही व्यापाऱ्यांनी बाजारपेठेत आंब्याची मागणी वाढत असल्याने त्यावर पर्याय काय, असा प्रश्न उपस्थित केला. शासनाने किंवा बाजार समितीने फळे पिकविण्यासाठी व्यापाऱ्यांना रॅपिंग चेंबर्सची सोय उपलबध करून दिल्यास सोईचे होईल असे म्हणणे मांडले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2013 1:04 am

Web Title: naturally ripped mango should sale
टॅग Mango
Next Stories
1 काँग्रेसच्या प्रभारी शहर जिल्हाध्यक्षपदी सारडा
2 जिल्ह्य़ातील धरणांमध्ये मे महिन्यातच ठणठणाट
3 मुळा डावा कालवा लाभक्षेत्रात पाण्याची मागणी
Just Now!
X