News Flash

महापालिका शाळा शिक्षकांच्या मानधनात वाढ

नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागात कार्यरत असणाऱ्या ठोक मानधनावरील १६० शिक्षकांना अखेर मानधनात वाढ देण्याच्या प्रस्तावाला मंगळवारी झालेल्या महासभेत

| March 18, 2015 07:26 am

नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागात कार्यरत असणाऱ्या ठोक मानधनावरील १६० शिक्षकांना अखेर मानधनात वाढ देण्याच्या प्रस्तावाला मंगळवारी झालेल्या महासभेत प्रशासनाने मान्यता दिली. शिक्षकांचा प्रश्न शेवटच्या महासभेत का होईना मंजूर झाल्याने शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. शिक्षकांच्या मानधनात सरसकट तीन ते पाच हजार रुपयांची वाढ झाली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या १७ माध्यमिक शाळेत ३३ शिक्षक, तर प्राथमिक विभागात १२७ शिक्षक ठोक मानधनावर सेवेत आहेत. वर्षांनुवर्षे सेवेत असणाऱ्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ७ ते ८ हजार रुपये मानधन दिले जाते. आपल्याला वेतनश्रेणीनुसार वाढीव मानधन मिळावे यासाठी त्यांनी तत्कालीन पालकमंत्री गणेश नाईक यांना जनता दरबारात निवेदन दिले होते. पालकमंत्र्यांनी वेतनवाढीबाबतच्या सूचना देऊनही सदरचा प्रस्ताव महापालिकेकडे प्रलंबित होता. मागील महिन्यात वाढीव वेतन मिळावे यासाठी आंदोलनदेखील करण्यात आले होते. गेल्या महासभेमध्ये सत्ताधारी सदस्यांनी सभागृहात हा विषय उचलून धरत प्रशासनाच्या विरोधात आंदोलन केले होते.
मंगळवारी झालेल्या महासभेत तातडीच्या कामकाजामध्ये सभागृह नेते अनंत सुतार यांनी हा प्रस्ताव मांडला असता विविध सदस्यांनी आणि विरोधी पक्षनेता सरोज पाटील यांनी या प्रस्तावाला सहमती दर्शवली. या मानधनवाढीत माध्यमिक शाळेतील शिक्षकांना आठ हजार रुपयेऐवजी आता १३ हजार रुपये मानधन, तर प्राथमिक शिक्षकांना सात हजार वरून १० हजार रुपये मानधन दिले जाणार आहे.
महापौर सागर नाईक यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत असणाऱ्या शिक्षक मंडळातील या मानधनावरील शिक्षकांना न्याय देण्यात यशस्वी झाल्याची भूमिका मांडली. लगतच्या इतर ठाणे, मुंबई, कल्याण या महापालिकांपेक्षा नवी मुंबई महानगरपालिकेची स्थिती चांगली असून शिक्षकांना अंतिम वाढ देणारी ही पुणेनंतरची दुसरी महापालिका असल्याचे महापौर म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2015 7:26 am

Web Title: navi mumbai bmc schools teacher salary increase
Next Stories
1 पाण्यासाठी महिलांचा मोर्चा
2 सर्वपक्षीय उमेदवारांच्या मुलाखतींचा धूमधडाका
3 प्रकल्पग्रस्तांची क्लस्टर योजना केवळ कागदावरच राहणार
Just Now!
X