News Flash

ऐरोलीत दुकानांचे फलक दिसण्यासाठी महापालिकेकडून वृक्षांची छाटणी

ऐरोली, सेक्टर २ येथील अनुज हॉटेल ते पारसिक बँक या रस्त्याच्या पदपथावर असलेल्या अशोकाच्या झाडांची छाटणी करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे ही छाटणी रात्रीच्या वेळेत

| September 30, 2014 07:05 am

ऐरोली, सेक्टर २ येथील अनुज हॉटेल ते पारसिक बँक या रस्त्याच्या पदपथावर असलेल्या अशोकाच्या झाडांची छाटणी करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे ही छाटणी रात्रीच्या वेळेत करण्यात आली आहे. ही छाटणी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केली असून या ठिकाणी असलेल्या दुकानांचे फलक दिसावेत यासाठी हा सर्व घाट घालण्यात आला असल्याचा आरोप निसर्गप्रेमींनी केला आहे.
मान्सूनपूर्व रस्त्यांमध्ये अडथळा ठरणाऱ्या आणि धोकादायक असलेल्या झाडांची महापालिकेकडून छाटणी करण्यात येते. मात्र या ठिकाणी असलेली झाडे धोकादायक अथवा अडथळा ठरत नसतानाही पावसाळा गेल्यानंतर ही छाटणी का करण्यात आली, असा संतप्त सवाल निसर्गप्रेमींकडून व्यक्त केला जात आहे. नवी मुंबईत एका बाजूला विविध सामाजिक संघटना ‘झाडे लावा, झाडे जगवा’ असा संदेश देत आहेत. पण महापालिका अधिकारी व्यावसायिकांच्या सोयीसाठी मान्सूननंतर वृक्षछाटणी करीत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या संदर्भात नवी मुंबई महानगरपालिका उद्यान विभाग अधिकारी विलास पडवळ यांच्याशी संपर्क साधला असता महानगरपालिकेकडून झाडांची छाटणी करण्यात आल्याचे त्यांनी मान्य केले; परंतु ही छाटणी रहिवाशांनी केलेल्या तक्रारीवरून करण्यात आली असल्याचे सांगितले. झाडांची छाटणी केव्हा करण्यात आली याची माहिती विचारली असता, आता निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याचे सांगत अधिक माहिती देण्यास त्यांनी टाळाटाळ केली.

ऐरोली परिसरात पालिकेचे अधिकारी अनेक ठिकाणी विनापरवाना आणि दुकानदारांच्या संगनमताने वृक्षांची छाटणी करीत आहेत. पालिकेकडे याविरोधात अनेकदा नागरिकांनी तक्रारीदेखील केल्या. मात्र पर्यावरणाच्या संवर्धनाबाबत उदासीन असलेल्या पालिका अधिकाऱ्यांमुळे ऐरोली शहर बकाल होत चालले आहे.
अ‍ॅड. विशाल मोहिते, निसर्गप्रेमी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2014 7:05 am

Web Title: navi mumbai mahanagar palika cut trees to view shop board
टॅग : Loksatta
Next Stories
1 उरण तालुक्यातील समस्या कायम
2 जीटीआयच्या चार बडतर्फ कामगारांना
3 कोणी उमेदवार देता का उमेदवार?
Just Now!
X