News Flash

सातबारा: नवी मुंबई महापालिका निवडणूक

सानपाडा, शिवाजीनगर, जुईपाडा, नेरुळ, शिरवणे गाव येथील हे १५ प्रभाग असून यात भाजपचा कस लागणार आहे.

| April 17, 2015 07:30 am

सानपाडा, शिवाजीनगर, जुईपाडा, नेरुळ, शिरवणे गाव येथील हे १५ प्रभाग असून यात भाजपचा कस लागणार आहे. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख मनोहर गायखे यांच्या प्रभागात विद्या पावगे यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यांचा सामना संगीता बोऱ्हाडे यांच्या बरोबर होणार आहे. त्यामुळे गायखे यांच्या दृष्टीने हे जागा निवडून येणे महत्त्वाचे आहे. त्यावर त्यांचे भवितव्य अवलंबून आहे. काँग्रेसचे अध्यक्ष दशरथ भगत यांनी काँग्रेसची अनेक तिकिटे आपआपसात वाटून घेतली आहेत. पक्षाकडे खंबीर उमेदवार नसल्याने त्यांना दुसरा पर्याय नव्हता. त्यामुळे प्रभाग क्रमांक ७७ मधून त्यांची पत्नी वैजयंती यांची भाजपच्या उज्ज्वला बेल्हेकर यांच्याबरोबर होणार आहे. ही जागा भाजपला जाणीवपूर्वक देण्यात आली आहे. पालिकेचे पहिले सभागृह नेते जयवंत सुतार यांची राजकीय कारकीर्द प्रभाग क्रमांक ८१ मध्ये पणाला लागली असून त्यांची लढत नगरसवेक काशिनाथ पाटील यांच्या बरोबर होणार आहे. प्रभाग क्रमांक ८२ मध्ये १६ उमेदवार असून राष्ट्रवादीचे विजय साळे व सेनेचे विशाल ससाणे अशी लढत होणार आहे. नगरसेवक रंगनाथ औटी प्रभाग क्रमांक ८४ मधून नगरसेविका स्नेहा पालकर यांच्याबरोबर लढत देणार आहेत. यात भाजपचे बंडखोर दिलीप तिडके आपले नशीब आजमवणार आहेत. जयवंत सुतार यांचे पुतणे प्रभाग क्रमांक ८९ मध्ये सेनेच्या ज्ञानेश्वर सुतार यांच्याबरोबर सामना करणार असून ९० मध्ये मनीषा जवेरी व मीरा पाटील यांची लढत होणार आहे.

विकास आणि अपेक्षा
सानपाडा पसिरातील उच्चभ्रू वस्तीमध्ये मोकळ्या भूखंडावर डेब्रिज टाकले जात असल्याने स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत. सानपाडा सेक्टर ५ परिसरातील व गावठाणातील गलिच्छ वस्तीमुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. शिरवणे जुईनगर पारिसरात मैदानाची दुरवस्था झाली असून फेरीवाले मोठय़ा प्रमाणात वाढले आहेत. जुईनगरमध्ये एका सुसज्ज उद्यानाची व्यवस्था करण्यात यावी ही अपेक्षा आहे. फेरीवाल्यांना हटवण्यात यावे अशी मागणी आहे. नेरुळ सेक्टर २ परिसरात उघडय़ा नाल्यामुळे दुर्गंधीचे साम्राज्य आहे. नेरुळ सेक्टर ९ व १० परिसरात पार्किंग व फेरीवाल्यांची समस्या भेडसावत आहे. नाल्याची वेळोवेळी साफसफाई होत नाही.
सारसोळे गावातील बहुउद्देशीय केंद्र समाजोपयोगी कामासाठी वापरले जात नसल्याचा आरोप केला जात आहे. साफसफाईचीदेखील मोठी समस्या या ठिकाणी आहे.
सारसोळे डेपो अपप्रवृत्तीचा वेढा पडला आहे. नेरुळ सेक्टर ११ परिसरात पदपथाची कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत. या पदपथावर फेरीवाल्याचे साम्राज्य आहे. सानपाडा परिसरात पामबीच मार्गालगत उद्याने व रस्ते उत्कृष्टरीत्या बनवण्यात आली आहेत. सानपाडय़ातील पालिका शाळेचा विकास उत्तमरीत्या करण्यात आला आहे. सानपाडा येथील उद्यानेदेखील सुस्थितीत आहेत. नेरुळ परिसरात पदपथ, रस्ते तसेच नाल्याची स्थिती चांगली आहे. शिरवणे येथे रेल्वे मार्गाखालील भुयारी मार्ग रुंदीकरण झाल्याने वाहतुकीचा मोठा अडथळा दूर झाला आहे. तसेच याच परिरसरातील तलाव व स्मशानभूमी सुशोभीकरण केल्यामुळे या समस्यांचे निराकरण करण्यात आले आहे.

प्रभाग क्रमांक ७६ ते ९० मधील लढती
प्र. क्र. ७६
सानपाडा से. २,३,४ व ८
मतदार ७८८४
राष्ट्रवादी – संगीता बोऱ्हाडे
शिवसेना – विद्या पावगे
काँग्रेस – ऐश्वर्या सांवत

प्र. क्र. ७७
सानपाडा से. १३, १४ व १५
मतदार ७५४५
राष्ट्रवादी – अर्चना भगत
भाजप – उज्ज्वला बेल्हेकर
काँग्रेस – वैजयंती दशरथ

प्र. क्र. ७८
सानपाडा सेक्टर १६,
१७, १८, १९, २२
मतदार ३५८९
राष्ट्रवादी – वैशाली ठोंबरे
भाजप – प्रणाल पाटील
काँग्रेस – रुपाली भगत

प्र. क्र. ७९
सानपाडा से. ७, ८, ९, १०, ११
मतदार ७२९७
राष्ट्रवादी – नम्रता बारवे
शिवसेना – ऋचा पाटील
अपक्ष – सुषमा कापसे

प्र. क्र. ८०
शिवाजी नगर, बोनसरी, एमआयडीसी
मतदार ५४०७
राष्ट्रवादी -कविता आंगोडे
भाजप – सपना भोईर
काँग्रेस – किरण पाटील

प्र. क्र. ८१
शिरवणे से. १ गावियो
मतदार ७३६७
राष्ट्रवादी- जयंवत सुतार
भाजप – कशिनाथ पाटील
काँग्रेस – देविदास सुतार

प्र. क्र . ८२
नेरुळ से. २ सानपाडा
से. २४, २५ भाग
मतदार ७८९०
राष्ट्रवादी – विजय साळे
शिवसेना – विशाल ससाणे
काँग्रेस – रवींद्र सांवत

प्र. क्र. ८३
जुईपाडा गोवियो से. २३ सानपाडा
मतदार ६११७
राष्ट्रवादी – तनुजा मढवी
शिवसेना – राजश्री पेडामकर
काँग्रेस – नयना तळेकर

प्र. क्र. ८४
नेरुळ से. २, ४ सानपाडा
से. २१ व २५
मतदार ९१४१
राष्ट्रवादी – स्नेहा पालकर
शिवसेना – रंगनाथ औटी
काँग्रेस – दीपक आंबेकर
अपक्ष – दिलीप तिडके

प्र. क्र. ८५
नेरुळ से. १४, ६ सारसोळे गाव
मतदार – ५८६५
राष्ट्रवादी – सुजाता पाटील
शिवसेना – समुद्रा पाटील

प्र. क्र. ८६
नेरुळ से. ६ सारसोळे
गाव व गावियो
मतदार ६६९९
राष्ट्रवादी – जयश्री ठाकूर
शिवसेना – राधा ठाकूर
अपक्ष – वर्षां डोळे

प्र. क्र. ८७
नेरुळ से. ८ व से. १०
मतदार ८५७३
राष्ट्रवादी -ज्योती लोखंडे
शिवसेना – सुनीता मांडळे
काँग्रेस – संगीता पाटील
अपक्ष – वैशाली तिडके

प्र. क्र. ८८
नेरुळ से. १५, ११ , ३, १९
मतदार १०२३४
राष्ट्रवादी – शशिकला मालादी
भाजप – शैला कानडे
काँग्रेस – नूतन राऊत

प्र. क्र. ८९
शिरवणे गाव, से. १ गावियो
मतदार ५४२७
राष्ट्रवादी -जयेंद्र सुतार
शिवसेना – ज्ञानेश्वर सुतार
काँग्रेस – प्रकाश पाटील

प्र. क्र. ९०
नेरुळ से. ७, ५, ९ व
से. ११, १५, १ ए भाग
मतदार ९६६१
राष्ट्रवादी – मनीषा जवेरी
शिवसेना – मीना पाटील
काँग्रेस – मीरा पाटील

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2015 7:30 am

Web Title: navi mumbai mahanagar palika election 2015 2
टॅग : Survey
Next Stories
1 मतदारांना ‘एसी’
2 युतीतील बंडखोरीमुळे राष्ट्रवादीला संजीवनी?
3 मुंबईतील ‘डेब्रिज’ माफियांसाठी नवी मुंबई ‘डंपिंग ग्राऊंड’
Just Now!
X