महापे एमआयडीसीतील आदिवासीबहुल, तळवली, घणसोली, कोपरखैरणे ग्रामीण व शहरी भाग या वीस प्रभागांत येत आहेत. या विभागातील घणसोली प्रभाग क्रमांक ३२ मध्ये मोठी रंजक लढाई होणार असून काका-पुतणे आमनेसामने उभे ठाकले आहेत. एकेकाळी गळ्यात गळा घालून फिरणारे हे काका-पुतणे आता निवडणुकीदरम्यान एकमेकांचे शत्रू बनले आहेत. नगरसेवक काका संजय पाटील (अंकल) यांचा पुतण्या प्रशांत पाटील सामना करणार आहे. या लढतीबरोबरच कोपरखैरणे येथील प्रभाग क्रमांक ४० मध्ये लक्षवेधी निवडणूक होणार आहे. चतुर नगरसेवक म्हणून संपूर्ण शहरात ओळखले जाणारे शिवराम पाटील हे राष्ट्रवादीचे केशव म्हात्रे यांच्या बरोबर थेट लढत देणार आहेत. पाटील यांनी निवडणुकीपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला असून ते गेली चार सत्र नगरसेवक आहेत. त्यांची पत्नी अनिता पाटील या शेजारच्या प्र. क्र. ३९ मध्ये निशा पाटील यांच्याबरोबर लढणार आहेत. या दोन प्रमुख लढतीबरोबरच आकाशगंगा सोसायटीच्या पुनर्बाधणीसाठी संघर्ष करणारे देवीदास हांडेपाटील हे नवोदित भाजपच्या सागर कदम यांच्या विरोधात उभे आहेत. कोपरखैरणे सेक्टर ७, १५, १६ बनलेल्या प्रभाग क्रमांक ४४ मध्ये राष्ट्रवादीच्या अ‍ॅड. भारती पाटील यांच्यासमोर दोन अपक्ष उमेदवार प्रिया गोळे व राजश्री शेवाळे यांचे आव्हान उभे ठाकले आहे. घणसोलीत माजी नगरसेवक निवृत्ती जगताप यांचा पुन्हा कस लागणार असून भाजपच्या रवी जगताप यांच्याबरोबर संघर्ष करणार आहेत. राष्ट्रवादीच्या माजी महिला अध्यक्षा कमल पाटील यांनी तिकीट वाटपाच्या आदल्या दिवशी राष्ट्रवादीला रामराम ठोकून सेनेत प्रवेश करून उमेदवारी पटकावली आहे. त्यांची लढत नगरसेवक संजय पाटील यांची पत्नी छाया पाटील यांच्याबरोबर आहे. याशिवाय घणसोली घरोंदा येथील मनसेचे माजी सचिव संदीप गलुगुडे यांची पत्नी मंदा यांची लढत सेनेच्या दीपाली सकपाळ यांच्याबरोबर आहे. प्रभाग क्रमांक ३६ मध्ये सेनेचे बंडखोर विभागप्रमुख घनश्याम मढवी यांच्या पत्नी ललिता मढवी या प्रशांत पाटील यांची पत्नी सुवर्णा पाटील यांच्याबरोबर लढणार आहेत. या प्रभागात नातेवाईकांमध्ये लढाई आहे.

विकास आणि अपेक्षा
तळवली परिसरामध्ये गलिच्छ वस्तीमुळे सर्वत्र दरुगधी पसरली असल्याने या दरुगधीवर आळा घालावा. तलाव सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बंदिस्त करावा, घणसोली अर्जुनवाडी शंकर बुवा वाडी येथील रस्त्याचे रुंदीकरण केले जावे अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. घणसोलीतील दगडू चाहू पाटील चौकाला फेरीवाल्यांचा विळखा बसला आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना चालणे जिकीरीचे झाले आहे. येथील शहरी वसाहतीमध्ये बसफेऱ्यांची संख्या वाढावी, व्यापक प्रमाणात द्यावी अशी अपेक्षा असून रिक्षाचालकांच्या मनमानीमुळे बससेवेवर परिणाम होत आहे. हावरे चौकात वाहतूक कोंडीचा त्रास होत असून कोपरखरणे गावठाण क्षेत्रातील साठवण तलावाचा विकास करून या ठिकाणी तलावांचे सुशोभीकरण करण्यात आलेले आहेत. गणेश विसर्जनासाठीदेखील स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे. मात्र याच परिसरातील फेरीवाल्यांनी रस्त्यावर कब्जा केल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. जनतेला या ठिकाणी मोकळे रस्ते, परिपूर्ण पदपथ, उत्तम उद्यान, खेळायला मैदाने हवी अशी अपेक्षा आहे. कोपरखरणे सेक्टर १ ते ४ च्या परिसरामध्ये रस्त्यांची स्थिती उत्तम असून मात्र रस्ते अरुंद असल्याने वाहतूक कोलमडून पडत असते. उद्यानांचा विकासदेखील होऊ शकलेला नाही. मात्र नाल्यांची कामे व्यवस्थित झालेली आहेत.

प्रभाग क्रमांक २६ ते ४५ मधील लढती
प्र. क्र. २६
महापे (अडवली भुतवली)
मतदार ६९०५
राष्ट्रवादी – रमेश डोळे
भाजपा – नरेंद्र खुलात
प्र. क्र. २७  
तळवली नाका
मतदार ५८५१
राष्ट्रवादी – लक्ष्मीकांत पाटील
शिवसेना – गौतम बळवंते
प्र. क्र. २८
तळवली गावठाण दत्तनगर
मतदार ४८२९
राष्ट्रवादी – मोनिका पाटील
भाजपा – भगवान म्हात्रे
प्र. क्र. २९
घणसोली तळवली गावठाण
मतदार ६३५४
राष्ट्रवादी – निवृत्ती जगताप
भाजप – रवी जगताप
प्र. क्र. ३०
घणसोली गावठाण
मतदार ५४३१
राष्ट्रवादी – रामचंद्र पाटील
शिवसेना – द्वारकानाथ भोईर
काँग्रेस – शोभा पाटील
प्र. क्र. ३१
घणसोली गाव
मतदार ६३९७
राष्ट्रवादी – नीलम जगताप
शिवसेना – वैशाली वाघमारे
प्र. क्र. ३२
घणसोली सेक्टर ६
मतदार ३५५६
राष्ट्रवादी – संजय पाटील
शिवसेना – प्रशांत पाटील
प्र. क्र. ३३
घणसोली सेक्टर ४, ५ व ६
मतदार ४३३९
राष्ट्रवादी – अर्चना मालुसरे
भाजपा – उषा पाटील
प्र. क्र. ३४
घणसोली सेक्टर ७
मतदार २५८८
राष्ट्रवादी – छाया पाटील
शिवसेना – कमल पाटील
प्र. क्र. ३५
घणसोली सेक्टर ९
व ७ चा भाग
मतदार ३२७२
राष्ट्रवादी – सुषमा देशमुख
शिवसेना – दीपाली सकपाळ
अपक्ष – मंदा गलुगुडे
प्र. क्र. ३६
घणसोली सेक्टर १ व ३, ४चा भाग
मतदार ४१३४
शिवसेना – सुवर्णा पाटील
अपक्ष – छाया लेंगरे
अपक्ष – ललिता मढवी
प्र. क्र. ३७
कोपरखरणे सेक्टर १, १अ, २अ, ४
मतदार ७१९१
राष्ट्रवादी – सुरेखा सालदार
शिवसेना –  शोभा मोरे
प्र. क्र. ३८
कोपरखरणे सेक्टर २
व ३ चा भाग
मतदार ७७१६
राष्ट्रवादी – मीनाक्षी पाटील
शिवसेना – मेघाली राऊत
प्र. क्र. ३९
कोपरखरणे. गा.वि.यो.
सेक्टर १९, २० होल्डिग पाँड
मतदार ७४५८
राष्ट्रवादी – निशा पाटील
शिवसेना – अनीता पाटील
प्र. क्र. ४०
कोपरखरणे गावठाण
सेक्टर १९ व १८ चा भाग
मतदार ६०१६
राष्ट्रवादी – केशव म्हात्रे
शिवसेना – शिवराम पाटील
प्र. क्र. ४१
कोपरखरणे गावठाण
सेक्टर १९ गा.वि.यो
मतदार ५७१७
राष्ट्रवादी – छाया म्हात्रे
शिवसेना – ललिता म्हात्रे
काँग्रेस – अ‍ॅड. अनीता सणस
प्र. क्र. ४२
कोपरखरण सेक्टर २२, २३, १६ व १७ चा भाग
मतदार ८४२९
राष्ट्रवादी – देवीदास हांडे  
भाजपा – सागर कदम
प्र. क्र. ४३
कोपरखरणे सेक्टर १७
व १८ चा भाग
मतदार ६८०७
राष्ट्रवादी – रंजना शिंदे
शिवसेना – दमयंती आचरे
प्र. क्र. ४४
कोपरखरणे सेक्टर १५,
१६ व ७ चा भाग
मतदार ८१२४
राष्ट्रवादी – भारती पाटील  
अपक्ष – राजश्री शेवाळे आणि प्रिया गोळे
प्र. क्र. ४५
कोपरखरणे
सेक्टर ६, ३, ७ चा भाग
मतदार ९८८४
राष्ट्रवादी – संगीता म्हात्रे
भाजपा – मंदा पार्टे