ठाणे-वाशी-पनवेल हार्बर मार्गावरील रेल्वे स्थानके हे प्रेमीयुगुलांचे अड्डे बनले आहेत. रेल्वे स्थानकांच्या लगतच्या परिसरात अश्लील चाळे करीत हे प्रेमीयुगुल बिनधास्तपणे बसलेले पाहावयास मिळतात. सिडको आणि रेल्वे प्रशासनाकडून सुरक्षेचा अभाव असल्याने प्रेमीयुगुलांचे चांगलेच फावले आहे म् या ठिकाणी एखादा अनुचित प्रकार घडल्यास त्यास जबाबदार कोण, असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
रेल्वे स्थानकातील सुरक्षेची जबाबदारी सिडको आणि रेल्वे पोलिसांच्या ताब्यात आहे. त्यामुळे अश्लील चाळे करणाऱ्या या युगुलांकडे नवी मुंबई पोलीस ढुंकूनही पाहात नाहीत. ठाणे-वाशी मार्गावरील रेल्वे स्थानकांची निर्मिती सिडकोने केली आहे म् त्यांचे हस्तांतरण रेल्वे बोर्डाकडे करण्यात आलेले नाही म् त्यामुळे नवी मुंबईकर रेल्वे प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. रेल्वे स्थानकात असणारी सिडकोची सुरक्षाव्यवस्था कमकुवत असल्याने अनेक गैरप्रकार सुरू आहेत म् रेल्वे बोर्डाकडून पुरेशी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली नसल्याने रेल्वे स्थानकातील सुरक्षा कोणाच्या हाती, असा प्रश्न उपस्थित होत आहे. नवी मुंबईत कामानिमित्त आलेल्या युवक, युवती तसेच महाविद्यालयातील तरुण, तरुणींनी रेल्वे स्थानकांची चौपाटी केली आहे. मिळेल त्या ठिकाणी आणि मिळेल त्या अडोशाला हे प्रेमयुगुल अश्लील चाळे करताना आढळतात. अनेकदा येथील सुरक्षारक्षक व्यवस्था नसल्याने रेल्वे स्थानकाजवळ वाहने उभी करून तेथेही असे चाळे सुरू असतात. ऐरोली, घणसोली, कोपरखरणे, रबाळे, वाशी, नेरूळ या रेल्वे स्थानकांच्या बाहेर या प्रेमीयुगुलांचा उच्छाद वाढला आहे. याविषयी सिडकोच्या सुरक्षारक्षकांना विचारणा केली असता ‘हे प्रेमीयुगुल स्थानिक असल्याने आम्हालाच मारहाण करतात’, असा टाहो त्यांनी मांडला. अनेकदा या प्रेमीयुगुलाकंडून सुरक्षारक्षक पैसेदेखील घेऊन अभय देत असल्याचा आरोप महिला रेल्वे प्रवाशांनी केला आहे म् खासदार संजीव नाईक अनेकदा रेल्वे स्थानकाचा पाहणी दौरा करतात. या वेळी येथील जागृत महिलांनी सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला होता, तर प्रेमीयुगुलांच्या चाळ्यांना आळा घालण्यासाठी साकडे घातले होते. त्या वेळी रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सुरक्षारक्षक तैनात करणार असल्याचे सांगितले होते.