News Flash

नवरात्रोत्सवानिमित्त ‘लोकसत्ता ९९९ नवभक्ती नवरंग नवरात्री’ स्पर्धा

नवरात्रोत्सव आता अगदी केवळ काही दिवसांवर आला आहे. नवरात्रोत्सवानिमित्त ‘लोकसत्ता’तर्फे पुढील आठवडय़ात ‘लोकसत्ता ९९९-नवभक्ती, नवरंग, नवरात्री’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

| October 14, 2012 09:10 am

नवरात्रोत्सव आता अगदी केवळ काही दिवसांवर आला आहे. नवरात्रोत्सवानिमित्त ‘लोकसत्ता’तर्फे पुढील आठवडय़ात ‘लोकसत्ता ९९९-नवभक्ती, नवरंग, नवरात्री’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दुर्गा देवीने महिषासुराबरोबर नऊ रात्री १० दिवस युद्ध केले. या नऊ दिवसांत देवीने नऊ वेगवेगळी रूपे घेतली. नवरात्रीचे नऊ दिवस म्हणजे जणू भक्तीची नऊ रूपेच. यात ‘श्रवण’, ‘कीर्तन’, ‘स्मरण’, ‘पादसेवन’, ‘वंदन’, ‘अर्चन’, ‘दास्य’, ‘सख्य’, ‘आत्मनिवेदन’ या नऊ भक्ती आहेत. या नऊ दिवसांत माणसाच्या अभिव्यक्तीच्या रंगांची उधळण होते.. नवरात्रोत्सवाचा हा अर्थ लक्षात घेऊन जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत ‘लोकसत्ता ९९९- नवभक्ती, नवरंग, नवरात्री’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
नवरात्रोत्सवादरम्यान ‘लोकसत्ता’ची टीम मुंबई, नवी मुंबई, डोंबिवली येथील एकूण आठ नवरात्रोत्सव मंडळांना भेटी देणार आहे. मंगळागौर किंवा इतर पारंपरिक खेळांच्या स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. जे समूह अतिशय चांगल्या पद्धतीने मंगळागौरीचे व पारंपरिक खेळ सादर करतील, त्या समूहाला स्पर्धेच्याच ठिकाणी जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सतर्फे आकर्षक पारितोषिके दिली जाणार आहेत. यंदाच्या स्पर्धेदरम्यान हेमंत राणे आणि त्यांचा ग्रुप ‘जागरण’ आणि ‘जोगवा’ सादर करणार आहेत.
नवरात्रोत्सवात देवीची पूजा केली जाते, तसेच दांडिया आणि रासगरबा, भव्य सजावट, मोठय़ा मैदानात डीजेसह दांडियाचे आयोजन ठिकठिकाणी केले जाते. महाविद्यालयीन तरुण-तरुणी यात मोठय़ा उत्साहाने पारंपरिक तसेच वैविध्यपूर्ण कपडे परिधान करून सहभागी होतात, परंतु मध्यमवयीन महिला तसेच ज्येष्ठ नागरिक मोठय़ा प्रमाणावर सामील होऊ शकत नाहीत. असा महिलावर्ग मंगळागौरीचे खेळ आणि पारंपरिक खेळ सादर करण्याच्या या स्पर्धेत मात्र सहज सहभाग घेऊ शकतात. तसेच ज्या मंडळांना ‘लोकसत्ता’ची टीम भेट देणार आहे, तेथील स्पर्धकांचा खेळ पाहण्याचा आनंद लुटण्याची संधी महिलांना यानिमित्ताने मिळणार आहे. ‘लोकसत्ता ९९९ – नवभक्ती, नवरंग, नवरात्री’ या स्पर्धेमुळे नवरात्रोत्सवाला आगळी रंगत चढणार आहे.
दादर पूर्व, परळ पूर्व, डोंबिवली पूर्व, वाशी, वरळी, डोंबिवली पश्चिम तसेच दादर पश्चिम अशा ठिकाणच्या नवरात्रोत्सव मंडळांना ‘लोकसत्ता’ची टीम भेट देणार आहे.      

मंगळवार, १६ ऑक्टोबर     –  सेक्टर १० नवरात्री उत्सव मंडळ, वाशी
बुधवार, १७ ऑक्टोबर     – जय भवानी सार्वजनिक श्री नवरात्रोत्सव मंडळ, सेक्टर ९, वाशी
गुरुवार, १८ ऑक्टोबर    – सार्वजनिक श्री भवानी नवरात्रोत्सव सेवा मंडळ, नायगाव, दादर
शुक्रवार, १९ ऑक्टोबर     – परेल विभाग सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ, परळ
शनिवार, २० ऑक्टोबर    – विजय मित्र मंडळ, डोंबिवली पश्चिम
रविवार, २१ ऑक्टोबर     – अष्टविनायक क्रीडा मंडळ, वरळी पोलीस कॅम्प
सोमवार, २२ ऑक्टोबर     – ओमकार मित्र मंडळ सार्वजनिक नवरात्रोत्सव, डोंबिवली पूर्व
मंगळवार, २३ ऑक्टोबर     – अशोकवाडी सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ, दादर पश्चिम

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2012 9:10 am

Web Title: navratri loksatta upakarm
टॅग : Navratri
Next Stories
1 मराठी सिनेमा क्रांतीच्या उंबरठय़ावर!!
2 चित्रगीत : श्रीसिद्धिविनायक महाआरती व आदि गणेश
3 एका लग्नाची ‘तिसरी’ गोष्ट!
Just Now!
X