News Flash

राष्ट्रवादी हा युवकांचा पक्ष – क्षीरसागर

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांद्यापासून बांद्यापर्यंत एकतर्फी अभिसरणाची प्रक्रिया सुरू असून युवकांचे लोंढे या पक्षात प्रवेश करीत आहेत. शहरासह ग्रामीण भागातही मोठय़ा संख्येने युवक पक्षात सामील होत

| August 6, 2013 01:46 am

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांद्यापासून बांद्यापर्यंत एकतर्फी अभिसरणाची प्रक्रिया सुरू असून युवकांचे लोंढे या पक्षात प्रवेश करीत आहेत. शहरासह ग्रामीण भागातही मोठय़ा संख्येने युवक पक्षात सामील होत असल्याने राष्ट्रवादी हा युवकांचा पक्ष म्हणून ओळखला जात आहे. जोश व होश सोबत ठेवून विकासकामांना गती दिली जाईल, अशी ग्वाही देतानाच शहरातील भूमिगत जलनिस्सारणासाठी २४३ कोटींची महत्त्वाकांक्षी योजना राबविणार असल्याचे पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी सांगितले.
शहरातील बार्शी नाका परिसरात युवक राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा मंत्री क्षीरसागर यांच्या उपस्थितीत झाला. इमामपूरचे उपसरपंच अप्पा कदम व बाळू सुर्वे यांनी सहकाऱ्यांसह या वेळी राष्ट्रवादीत प्रवेश केला. जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती संदीप क्षीरसागर, माजी आमदार सय्यद सलिम, जनार्दन तुपे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गंगाधर घुमरे, युवकचे जिल्हाध्यक्ष शेख शफीक आदी या वेळी उपस्थित होते.
क्षीरसागर म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसची ओळख तरुणांचा पक्ष अशी झाली आहे. बीड शहर स्वच्छ सुंदर करण्यासाठी २४३ कोटींची भूमिगत जलनिस्सारण योजना राबवण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील पन्नासपेक्षा कमी पैसेवारीच्या गावांना ३६ कोटींचे अनुदान उपलब्ध करून देण्यात आले. ते तालुका तहसीलला पाठवण्यात आले. नरेगाअंतर्गत घेतलेल्या विहिरींनाही आठ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. केंद्र सरकारने अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत दारिद्रय़रेषेखालील जनतेला एक रुपया किलो ज्वारी, दोन रुपये किलो ज्वारी व तीन रुपये किलो तांदूळ असे दरमहा ३५ किलो धान्य देण्याचा निर्णय घेतला, असे सांगून सरकारच्या विविध योजनांची माहिती क्षीरसागर यांनी दिली. गंगाधर घुमरे यांनी प्रास्ताविक केले.
आमदार नवलेंना टोला
काँग्रेसचे आमदार सुरेश नवले यांचा थेट नामोल्लेख टाळून क्षीरसागर म्हणाले की, शहरासाठी माजलगाव बॅकवॉटर पाणीपुरवठा योजना राबविल्यामुळे या वर्षी दुष्काळात शहराला सुरळीत पाणीपुरवठा राहिला, अन्यथा स्थलांतराची वेळ आली असती. मात्र, याच योजनेला काही ‘ज्ञानी’ लोकांनी विरोध केला होता. डोमरी तलावातून योजना करण्याची मागणी केली होती. त्यात राजुरी परिसरातील लोकांना या तलावाच्या पाण्याचा फायदा होऊ नये, हे त्यांच्या पडद्याआडचे धोरण होते, अशा शब्दात टोला लगावला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2013 1:46 am

Web Title: ncp is youth party jaydatta kshirsagar
टॅग : Ncp
Next Stories
1 खाचखळगे लक्षात घेऊनच तंत्रज्ञान वापर हवा- कहाते
2 कावरखे यांचे सभापतिपद अखेर रद्द
3 राज्याच्या आरोग्य विभागात साडेतीन हजार कर्मचाऱ्यांची भरती
Just Now!
X