संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील विविध जाती, भाषा, प्रांत यांचा सखोल विचार करून समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्यायाच्या माध्यमातून प्रत्येक भारतीयांना हक्क व अधिकार मिळवून दिले. अथक परिश्रम घेऊन जगातील सर्वश्रेष्ठ अशी भारतीय संविधानाची निर्मिती केली. या संविधानाच्या यशस्वीतेसाठी भारतीयांमध्ये बंधुत्वाची भावना आवश्यक आहे, असे मत रिपाइं युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांनी व्यक्त केले.
 बीड येथे रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनच्या वतीने संविधान दिनानिमित्त संविधान गौरव सोहळा झाला. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे, जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव जावळेकर, अतिरिक्त मुख्याधिकारी डॉ. अशोक कोल्हे, महेंद्र निकाळजे आदी उपस्थित होते. यावेळी बोलतांना पप्पू कागदे म्हणाले, डॉ. बाबासाहेबांनी दोन वष्रे ११ महिने १८ दिवस अथक परिश्रम घेऊन राज्यघटना तयार केली. २६ डिसेंबर १९४९ मध्ये भारतीय संविधान देशाला अर्पण करुन प्रजासत्ताक भारताची निर्मिती केली. त्याची अंमलबजावणी २६ जानेवारी १९५० मध्ये झाली. भारतीय संविधान सक्षम असल्यामुळे भारताची एकता, अखंडता आजही जगाच्या नकाशावर टिकून आहे. या देशातील प्रत्येक माणूस आíथकदृष्टय़ा सक्षम झाला पाहिजे, हा विचार करून लोकशाही गणराज्य घडविण्यासाठी व संविधानाच्या यशस्वीतेसाठी भारतीयांनी बंधुत्वाची भावना निर्माण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

An account of the work done in 10 years is presented in BJP resolution
‘मोदी की गॅरंटी’चा जाहीरनाम्यात पुनरुच्चार; भाजपच्या ‘संकल्पपत्रा’त १० वर्षांतील कामांचा लेखाजोखा सादर
Ambedkari movement in the Bhil community Tribal woman and Dr Babasaheb Ambedkar
आदिवासी स्त्री आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर
mumbai high court marathi news, cm eknath shinde marathi news
शहीदांच्या कुटुंबीयांप्रती मुख्यमंत्र्यांनी मनाचा मोठेपणा दाखवावा, शहीद मेजर सूद यांच्या पत्नीच्या मागणीबाबत उच्च न्यायालयाची टिपण्णी
What Navneet Rana Said?
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर नवनीत राणांची पहिली प्रतिक्रिया, “मला माझी मुलं रोज विचारायची, आई…”