News Flash

आर्थिक नियोजनातील गाळ उपसण्याची आवश्यकता – चंद्रशेखर टिळक

भारतीय अर्थव्यवस्था खूप आश्वासक आहे आणि पुढेही तशीच राहणार आहे. आपण मात्र या व्यवस्थेकडे अतिशय नकारात्मक नजरेने पाहतो. त्यातून आर्थिक व्यवस्थेत नैराश्याचे वातावरण निर्माण होते.

| April 3, 2013 01:46 am

भारतीय अर्थव्यवस्था खूप आश्वासक आहे आणि पुढेही तशीच राहणार आहे. आपण मात्र या व्यवस्थेकडे अतिशय नकारात्मक नजरेने पाहतो. त्यातून आर्थिक व्यवस्थेत नैराश्याचे वातावरण निर्माण होते. वर्षांनुवर्ष हे नैराश्याचे साचलेपण आर्थिक व्यवस्थेत आले आहे. हे नैराश्याचे मळभ दूर करण्यासाठी आणि नवीन आर्थिक उभारीसाठी आर्थिक नियोजनातील साचलेपणाचा गाळ उपसणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेडचे कार्यकारी उपाध्यक्ष चंद्रशेखर टिळक यांनी येथे केले.
टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळातर्फे टिळक यांना आर्थिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल तेजस पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष आबासाहेब पटवारी, कार्याध्यक्ष सुरेश पिंगळे, कार्यवाह नी. द. शेबेंकर, सुहास खंडकर, निवृत्त प्राचार्य शाम अत्रे उपस्थित होते.
उद्योग, कृती व इतर सेवा क्षेत्रांत रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत. तरीही नियोजनात आपण आपले पारंपरिकपण टिकून ठेवण्यासाठी जुन्याच मंडळी आणि मतांचा विचार करून आर्थिक तरतुदी करतो. त्याचा लाभ प्रत्यक्ष किती जणांना होतो? त्यापेक्षा या क्षेत्रांमध्ये तरुणांना नजरेसमोर ठेवून तरतुदी केल्या तर मोठय़ा प्रमाणात तरुण कृषी, उद्योग क्षेत्राकडे वळतील. तरुणांच्या हातांना काम आणि त्यातून चांगला परतावा सरकारला मिळेल. हा दूरदृष्टीचा विचार होताना दिसत नाही, अशी खंत अर्थतज्ज्ञ टिळक यांनी व्यक्त केली.  ईशान्येकडील राज्यांची नैसर्गिक साधनसामग्री, ब्रीक्सच्या नवीन बँकेचे अध्यक्ष होणारे मनमोहन सिंग या सर्वाचा आपल्या विस्तारासाठी चीनला दूरदृष्टीने उपयोग करून घ्यायचा आहे. हे चीनला लवकर कळलेय पण भारताला नाही. दूरदृष्टी ठेवून हे आपले धोरण आता बदलणे गरजेचे आहे, असे टिळक म्हणाले.
पुरस्काराची रक्कम दुप्पट करून टिळक यांनी ती कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या ‘ग्रंथ तुमच्या दारी’ उपक्रमासाठी विनायक रानडे यांच्या स्वाधीन केली. या कार्यक्रमांमध्ये सामाजिक कार्यकर्ते मोहन बापट यांना डोंबिवली सेवा पुरस्कार, पत्रकार दिलीप करंबेळकर यांना सावरकर सेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2013 1:46 am

Web Title: need to clean the mud wich is in finance management chandrashekhar tilak
Next Stories
1 वृद्धाश्रमात रंगले कवितेचे कुटुंब…!
2 जकात नाके ओस, टोल नाक्यांवर रांगा
3 नवी मुंबईची वाटचाल बकालपणाकडे..
Just Now!
X