News Flash

५० तासांचा अभ्यास पाच तासांत!

नेट, सेट, पेट अशा स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी ५० तासांचा एक मार्गदर्शक अभ्यासक्रम घेण्याचा विद्यापीठ अनुदान आयोगाचा दंडक आहे. मात्र, मुंबई

| May 21, 2014 06:50 am

नेट, सेट, पेट अशा स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी ५० तासांचा एक मार्गदर्शक अभ्यासक्रम घेण्याचा विद्यापीठ अनुदान आयोगाचा दंडक आहे. मात्र, मुंबई विद्यापीठ ५० तासांचा हा अभ्यासवर्ग एका दिवसात, तेही चार-पाच तासांत, आटोपता घेते. विद्यापीठाच्या या अजब कारभारामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून इतर विद्यापीठांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यापीठाचे विद्यार्थी मागे पडत आहेत.
अनुदान आयोगाच्या नियमानुसार पुणे विद्यापीठ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ येथे नेट, सेट व पेटच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावे यासाठी रीतसर विशेष केंद्र सुरू करण्यात आले आहेत. त्याचा फायदा तेथील विद्यार्थ्यांना होतो. मात्र, मुंबई विद्यापीठ याबाबतीत उदासीन असल्याचे चित्र आहे. विद्यापीठाच्या अधिसभेत मार्गदर्शन वर्ग चांगल्या प्रकारे घेण्यात यावेत यावर वारंवार चर्चा केली जाते परंतु प्रशासन याबाबत गंभीर दखल घ्यायला तयार नसल्याचे दिसते. त्यामुळे विद्यार्थ्यांचेच नुकसान होत आहे. विद्यापीठ प्रशासनाला मात्र हा दावा मान्य नाही. विद्यार्थ्यांना नियमित प्रशिक्षण मिळत असून त्यात त्रुटी असल्यास त्या शोधून दुरूस्त करण्याची तयारी असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

पीएचडी विद्यार्थीही वाऱ्यावर
पेट परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांंना पीएचडीचा प्रबंध सादर करण्यासाठी आवश्यक ती तयारी करण्यासाठी एक अभ्यासक्रम पूर्ण करणे गरजेचे आहे. हा अभ्यासक्रम विद्यापीठात अनेक ठिकाणी घेतलाच जात नाही. या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांला माहिती कशी जमा करायची इथपासून ते संशोधन कशा पद्धतीने केले पाहिजे इथपर्यंत सर्व माहिती दिली जाते. पण मुंबई विद्यापीठात हे होताना दिसत नाही. हा अभ्यासक्रमही अनुदान आयोगाच्या नियमांनुसार सक्तीचा असून अभ्यासक्रम पूर्ण नसेल तर पीएचडी असेही या नियमांत नमूद आहे. विद्यापीठात अनेकांनी हा अभ्यासक्रम पूर्ण नसतानाही आपले प्रबंध सादर केले आहेत.

अनुदान आयोगाच्या दहाव्या योजनेनुसार हे मार्गदर्शन वर्ग होणे सक्तीचे आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांचे कौशल्य विकसीत केले गेले पाहिजे. तसेच विद्यार्थ्यांना विषयाचा मुळापासून अभ्यास कसा करायचा याची माहितीही दिली गेली पाहिजे. राज्यातील इतर विद्यापीठांत हे प्रशिक्षण योग्य प्रकारे दिले जाते त्यामुळे तेथे कुशल नेट, सेट विद्यार्थी मिळतात पण आपल्याकडे हे प्रशिक्षण नीट मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांंचे नुकसान होत आहे. प्रशिक्षण मिळाले असेल तर परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर  विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे काम करण्याची संधी मिळू शकते. यासाठी विद्यापीठ फारसे प्रयत्न करताना दिसत नाही. या प्रशिक्षणासाठी विद्यापीठाने काही दिवसांची कार्यशाळा अयोजित केली तरी हे होऊ शकते इतकेच नव्हे तर यासाठी वेगळे केंद्रही विद्यापीठ उभे करू शकते.
 संजय वैराळ, अधिसभा सदस्य

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 21, 2014 6:50 am

Web Title: negligence of mumbai university
Next Stories
1 पेन-पेन्सिलीही ‘नमो’ मय
2 गंभीर गुन्ह्यंचा‘फास्ट ट्रॅक’
3 ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’
Just Now!
X