News Flash

निवृत्ती धोंगडे ‘बॉडी झोन श्री’

सिडकोतील बॉडी झोन जिमखान्याच्या वतीने आयोजित शरीरसौष्ठव स्पर्धेत निवृत्ती धोंगडे यांनी ‘बॉडी झोन श्री २०१३’ हा किताब मिळविला. जिमखान्याचे संचालक भाऊदास सोनवणे यांनी आयोजित केलेल्या

| January 17, 2013 01:08 am

सिडकोतील बॉडी झोन जिमखान्याच्या वतीने आयोजित शरीरसौष्ठव स्पर्धेत निवृत्ती धोंगडे यांनी ‘बॉडी झोन श्री २०१३’ हा किताब मिळविला. जिमखान्याचे संचालक भाऊदास सोनवणे यांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेत एकूण २७ स्पर्धकांनी सहभाग घेतला.
उद्घाटन भगवंतदादा दोंदे, राजू सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेचे सरचिटणीस राजेंद्र सातपूरकर, नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी, साहेबराव सोनवणे, आशा थापा, राम भामरे, संदीप दोंदे, पंकज पवार आदी उपस्थित होते. ५५ किलो गटात भरत वळवी, ६० किलो गटात विजय कडभाने, ६५ किलो गटात निवृत्ती धोंगडे, ७० किलो गटात गुंजन सिंह यांनी गटविजेतेपद प्राप्त केले. गटविजेत्यांमध्ये ‘बॉडी झोन श्री २०१३’ या किताबाकरिता अंतीम लढत झाली. पंचांनी निवृत्ती धोंगडे यांच्या बाजूने कौल दिला. विजय कडभाने यांनी बेस्ट पोजरचा किताब मिळवला. भरत वळवी यांनी मोस्ट इम्प्रुव्हड बॉडी बिल्डरचा किताब मिळवला.
या प्रसंगी अक्षय गायकवाड यांनी संगीताच्या तालावर उत्कृष्ट प्रदर्शन केले. सूत्रसंचालन शाम बोरसे यांनी केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 17, 2013 1:08 am

Web Title: nevrutti dhongde body zone shree
Next Stories
1 तपोवन अजूनही वनातच
2 मुख्यमंत्र्यांसमोर पडला मागण्यांचा पाऊस
3 कायम विनाअनुदानित शिक्षण संस्थातील शिक्षकांचे आंदोलन
Just Now!
X