News Flash

पोषण आहाराबाबत शिक्षण विभागाचे, नवे परिपत्रक म्हणजे उशिराचे शहाणपण

पोषण आहारात ठिकठिकाणी झालेल्या गैरप्रकारानंतर मुख्याध्यापक संघाने पोषण आहारावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शिक्षण विभागाने आता पोषण आहारात आवश्यक तेवढय़ाच वस्तूंची मागणी नोंदविण्याचे आदेश

| August 12, 2013 01:53 am

पोषण आहारात ठिकठिकाणी झालेल्या गैरप्रकारानंतर मुख्याध्यापक संघाने पोषण आहारावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शिक्षण विभागाने आता पोषण आहारात आवश्यक तेवढय़ाच वस्तूंची मागणी नोंदविण्याचे आदेश काढले आहेत. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची ही कृती उशिरा सुचलेले शहाणपण या श्रेणीत असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.
जिल्ह्य़ातील पळशी येथे रुख्मीण विद्यालयातील पोषण आहार पुरून टाकल्याचे उघडकीस आल्यानंतर हा मुद्दा जिल्हाभर गाजला. जिल्हा परिषदेच्या मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या सभागृहात चर्चेत आला. पुढे ही कारवाई झालीच नाही. आडोळ येथील पोषण आहाराचे धान्य तलावात फेकण्यात आले. ती चौकशीही झाली नाही. असे प्रसंग वारंवार घडूनही काहीच झाले नाही. विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याच्या घटनेनंतर मराठवाडा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाने पोषण आहार योजनेवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शिक्षण संचालकांनी काढलेल्या आदेशात आवश्यक तेवढय़ाच नोंदी करून पोषण आहाराची मागणी करावी, असे कळविले आहे. धान्य जास्त होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे शिक्षण संचालकांनी कळविले आहे. परिपत्रक व करारनाम्याचा नीट अभ्यास करावा. शिल्लक धान्याचे हिशेब नीट ठेवावेत आणि मागणी उशिरा नोंदविल्यास व विद्यार्थी आहारापासून वंचित राहिल्यास त्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर राहील, असे नव्याने कळविले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 12, 2013 1:53 am

Web Title: new circuler of mid day meal by education department
Next Stories
1 उपविभागीय कार्यालयाच्या मागणीसाठी मंगळवारी लोहारा बंद
2 बीडमध्ये ‘एक संध्याकाळ ज्येष्ठांसाठी’ कार्यक्रमाचे आयोजन
3 तहसीलदारांवर ट्रॅक्टर घातला!
Just Now!
X