02 December 2020

News Flash

‘व्होडाफोन’ची प्री-पेडसाठी नवी रोमिंग योजना

व्होडाफोन इंडिया लि. कंपनीने प्री-पेड ग्राहकांसाठी आज नवी आकर्षक देशभरासाठी रोिमग योजना दाखल केली असून या प्लॅनमुळे ग्राहकांना इन्कमिंग कॉल ३० पैसे प्रति मिनिट या

| April 27, 2013 01:30 am

व्होडाफोन इंडिया लि. कंपनीने प्री-पेड ग्राहकांसाठी आज नवी आकर्षक देशभरासाठी रोिमग योजना दाखल केली असून या प्लॅनमुळे ग्राहकांना इन्कमिंग कॉल ३० पैसे प्रति मिनिट या दराने मिळतील. आउटगोइंग कॉलचे दरही रोिमगमध्ये वा घरी असताना प्रति सेकंद १.५ पैसे इतके स्पर्धात्मक आहेत. या नव्या नॅशनल रोिमग प्लॅनसाठीचे दर प्रत्येक राज्यानुसार २६ ते ४७ रुपये असे आहेत. नव्या रोिमगप्लॅनमुळे ग्राहकांना परवडणाऱ्या रोमिंगच्या दरात सुटय़ांचा आनंद घेता येईल. एसएमएस, डाटा रोमिंग आणि आयएसडी रोमिंग यासाठी स्टँडर्ड दर आकारले जातील. या प्लॅनसोबत ३० दिवसांचा रोमिंग इन्किमग फायदा आणि १८० दिवसांची टेरिफ वैधता आहे, अशी माहिती व्होडाफोन इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र चिफ कमर्शिअल ऑफिसर विवेक माथूर यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2013 1:30 am

Web Title: new roaming plan for prepaid by vodafone
Next Stories
1 आरोग्य विभागातील घोटाळय़ाबाबत शिस्तभंगाच्या कारवाईचा प्रस्ताव
2 ठेका एका ठिकाणचा, उपसा मात्र दुसरीकडून
3 नैसर्गिकरीत्या पिकवलेले आंबेच विक्रीस ठेवावेत
Just Now!
X