पाणी वापर संस्था तयार करण्यासाठी जलसंपदा विभागाकडून दरवर्षी लाखो रुपये खर्च होतात. मात्र, पाणी वापर संस्थेने काम कसे करायचे, या विषयीची प्रशिक्षणेही होतात. मात्र, प्रत्यक्ष कामकाजाच्या वेळी अडचणी लक्षात घेऊन जल आणि भूमी व्यवस्थापन संस्थेने नवीन सॉफ्टवेअर विकसित केले आहे.
पाणी वापर संस्थेतील सभासदांची यादी, त्यांचे क्षेत्र अशी माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावी. कोणत्या कालखंडात कोणत्या कालव्यातून किती दिवस पाणी येऊ शकेल, हे जाणून घेण्यासाठी या प्रणालीचा उपयोग होणार आहे. कालव्यातून सोडलेले पाणी किती दिवस चालू राहील, ते कधी बंद होणार याचे वेळापत्रकही या सॉफ्टवेअरच्याद्वारे पाणी वापर संस्थेला पाहायला मिळू शकेल. हे सॉफ्टवेअर पाणी वापर संस्थांना मोफत दिले जाणार आहे. पाणी मागणीचा अर्ज, प्रचलन आराखडा व ४२ प्रकारच्या फॉर्मचा वापर करता येऊ शकेल, अशी व्यवस्था यात करण्यात आली आहे.

Defence Institute of Advanced Technology pune jobs
DIAT Pune recruitment 2024 : पुणे शहरात नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ रिक्त पदांवर होणार भरती; जाणून घ्या….
Kandalvan, Kandalvan belt,
ज्वलनशील पदार्थांद्वारे कांदळवनावर घाला, सिडकोकडील २३० हेक्टर कांदळवन पट्टा हस्तांतरीत करण्यास टाळाटाळ कशासाठी ?
IITM Pune Bharti 2024
Pune Jobs : IITM पुणे येथे नोकरीची संधी, आजच अर्ज करा, एवढा मिळणार पगार
idea of ​​educational institutes
बीबीए, बीसीएबाबत शिक्षण संस्थांची नवी शक्कल… होणार काय?