शेतीतला अनुभव व प्रयोगशीलता याचा मेळ साधल्यास दहावीपर्यंत शिक्षण घेतलेला शेतकरीही स्वप्रयत्नातून सोन्यासारखे पीक घेऊ शकतो. त्यातून गव्हासारखे पीकही एकरी तब्बल २४ क्विंटलचे उदंड माप बळिराजाच्या पदरात टाकू शकते. सलग तीन वर्षे वेगवेगळे प्रयोग करताना गव्हाची ‘शिवशांती’ ही नवीन जात विकसित करून निलंगा तालुक्यातील विष्णू शिवाजी चामे या तरुण शेतक ऱ्याने ही किमया करून दाखविली.
मराठवाडय़ात मुळातच गव्हाचे उत्पादन कमी होते. या पाश्र्वभूमीवर आनंदवाडीच्या विष्णू चामे (वय ४०) या शेतकऱ्याचा हा प्रयत्न गव्हाचे पीक घेणाऱ्या शेतक ऱ्यांना पर्वणी ठरावा. गव्हाचे देशात सरबती व बन्सी या दोन प्रकारचे पीक घेतले जाते. पहिल्या हरितक्रांतीत सरबती कुळातील वाण विकसित झाले. यात एचडी २१८९, कल्याण सोना, लोक वन, सोनालिका, एमएसीएस २४९६ ही वाणे अधिक उत्पादन देणारी व तांबेरा रोगास प्रतिबंधक आहेत. मात्र, राज्यात, त्यातही मराठवाडय़ात गव्हाचे सरासरी उत्पादन राष्ट्रीय उत्पादनापेक्षा कमी आहे. वेळेवर पेरणी न होणे, बीजप्रक्रियेचा अभाव, खत व पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन, सेंद्रिय खताचा अभाव, अयोग्य जमिनीची निवड, प्रतिहेक्टरी रोपांची कमी संख्या, तण व उंदरामुळे होणारे नुकसान, एकात्मिक कीडरोग व्यवस्थापनाचा अभाव आदी यामागील कारणे आहेत.
आधुनिक तंत्राचा अवलंब करूनही आतापर्यंत एकरी १० ते १२ क्विंटलच्या पुढे गव्हाचे उत्पादन मिळू शकत नाही. मात्र, विष्णू चामे यांनी या पिकात नवे काही करता येईल काय, याचा ध्यास घेत आपले नातेवाईक, मित्र यांच्यासह सांगली भागातून मोठी ठुशी दिसणारे बियाणे गोळा केले. त्यातून निवड पद्धतीने लावणी घेतली. पहिल्या वर्षी आलेल्या गव्हातील जोमदार दिसणाऱ्या पिकातील बियाणे निवडले. सलग ३ वष्रे हा प्रयोग करून जास्त फुटवे देणारी, उंचीला मध्यम, जमिनीवर न लोळणारी, रोगांना बळी न पडणारी जात विकसित केली. त्याचे अडीच किलो बियाणे तयार केले व १० गुंठय़ांमध्ये टोकन पद्धतीने लावून त्यापासून ६ क्विंटल उत्पादन काढले. या बियाण्यास आपल्या आई-वडिलांचे नाव, ‘शिव-शांती’ दिले.
गतवर्षी उशिराने थंडी पडल्याने १० डिसेंबरला याची लागवण केली. शेतात गावरान खत, बीजप्रक्रिया करून टोकन पद्धतीने लागवण केली. पाण्याच्या पाच पाळय़ा दिल्या. तणनियंत्रणासाठी दोनदा खुरपण केले. खते व सूक्ष्म अन्नद्रव्याचा डोस दिला. योग्य नियोजनामुळे एका ठिकाणी २२ ते २४ फुटवे तयार झाले. ठुशीची लांबी २२ सेंमी, तर एका ठुशीत १०० ते १०५ दाणे व त्याचे वजन १५ गॅ्रम भरले. एरवी जो गहू घेतला जातो त्याचे एकरी ८ क्िंवटल सरासरी उत्पादन मिळते. चामे यांनी विकसित केलेली जात ११० दिवसांत (साडेतीन महिने) उत्पादन देते.
पुढील वर्षी शेतकऱ्यांना हे नवे बियाणे उपलब्ध करता येईल, या साठी कृषी अधिकारी रमेश चिल्ले त्यांना मार्गदर्शन करीत आहेत. रब्बी हंगामात हरभऱ्याला कमी पाणी लागते व जास्त उत्पादन मिळते म्हणून बहुतांश शेतकरी हरभरा घेतात. चामे यांच्या या प्रयोगामुळे जास्त उत्पादन देणारी जात उपलब्ध होणार असल्याने गव्हाचा पेरा व उत्पादनही निश्चितच वाढीस लागणार आहे.

Raj Thackeray
Heat Wave: राज ठाकरेंचं मुक्या प्राण्यांसाठी भावनिक आवाहन
life of fish, fish in river, fish danger,
नदी, तलावातील माशांचे आयुष्य का धोक्यात आलंय? काय आहे नवं संशोधन?
feast of snowballs juicy fruits and green fodder for animals at Karunashram Orphanage in Wardha
वन्यप्राणी करताहेत उन्हाळा एन्जॉय! बर्फ के गोले, रसभरीत फळे अन हिरवा चारा यांची मेजवानी
Mata Mahakali Yatra in Chandrapur to Commence on 14 April
१४ एप्रिलपासून माता महाकालीच्या यात्रेला सुरूवात; एक महिना चालणार यात्रा, तयारी पूर्ण