जिल्हा मराठी पत्रकार संघाद्वारे आयोजित विविध वार्ता पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून रवी खाडे, यशवंत मुल्लेमवार, साईनाथ सोनटक्के, सीमा मामीडवार व भीमा वानखेडे यांची निवड करण्यात आली आहे.
 याप्रसंगी नागभीड येथील पत्रकार साप्ताहिक नागभीड सेवकचे संपादक शिवराम कोसे यांना पत्रमहर्षी बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार, चंद्रपूर शहर वाहतूक शाखा नियंत्रक पोलीस निरीक्षक पुंडलिक सपकाळे यांना लोकमान्य टिळक स्मृती पुरस्कार आणि सामाजिक कृतज्ञता पुरस्कारासाठी उषा बुक्कावार यांचा गौरव करण्यात येणार आहे.
चंपतराव लडके स्मृती सेवाव्रती पत्रकार पुरस्कार माजरी येथील पत्रकार बाळ निंबाळकर यांना जाहीर झाला.
 सर्व विजयी स्पर्धकांना ६ जानेवारी रोजी पत्रकार दिनी शाल-श्रीफळ, स्मृतीचिन्ह आणि रोख १००१ रुपये देऊन गौरविण्यात येणार आहे. श्रीनिवास तिवारी स्मृती शोधवार्ता पुरस्कारासाठी लोकमतचे वरोराचे प्रतिनिधी रवी खाडे, समता नालमवार जिल्हा विकास वार्ता पुरस्कारासाठी महाविदर्भचे चंद्रपूर प्रतिनिधी यशवंत मुल्लेमवार, चांगुणाताई मुनगंटीवार स्मृती पर्यावरण वार्ता पुरस्कारासाठी महाविदर्भच्या सीमा मामीडवार, शांताराम पोटदुखे पुरस्कृत शैक्षणिक संस्था विकासवार्ता पुरस्कारासाठी तरुण भारतचे प्रतिनिधी साईनाथ सोनटक्के यांची निवड करण्यात आली आहे.  
बसस्थानकावर वृत्तपत्र विकणारे भीमा वानखेडे यांना साप्तााहिक जनमत रक्षक पुरस्कृत रामवंती जयरामसिंह ठाकूर स्मृती पुरस्काराने गौरविण्यात येईल. स्पध्रेचे परीक्षण मोरेश्वर राखुंडे, डॉ. उमाकांत धोटे, मुरलीमनोहर व्यास यांनी घोषित केले.