पुढील वर्षी म्हणजेच २०१५ मध्ये सुट्टय़ांची चंगळ असून महत्त्वाच्या सर्व सणांच्या २४ सार्वजनिक सुट्टय़ा शनिवारी आल्या आहेत. पाच सुट्टय़ा शनिवारी आणि दोन सुट्टय़ा सोमवारी आल्या आहेत. अन्य वारी आलेल्या या सार्वजनिक सुट्टय़ांमुळे नोकरदार मंडळींसाठी ही खुषखबरच आहे.
ज्येष्ठ पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक दा. कृ. सोमणकृत ‘सोमण नॅनो पंचांग’ २०१५ श्रीगणेश चतुर्थीला प्रकाशित झाले. त्यात ही माहिती देण्यात आली आहे.
पुढील वर्षीच्या सुट्टय़ा पुढीलप्रमाणे
ईद ए मिलाद-रविवार, ४ जानेवारी, प्रजासत्ताक दिन-सोमवार २६ जानेवारी, महाशिवरात्र-मंगळवार, १७ फेब्रुवारी, छत्रपती शिवाजी महाराज जयंती- गुरुवार १९ फेब्रुवारी, होळी-धूलीवंदन- शुक्रवार ६ मार्च, गुढीपाडवा- शनिवार, २१ मार्च, श्रीरामनवमी-शनिवार, २८ मार्च, महावीर जयंती- गुरुवार, २ एप्रिल, गुडफ्रायडे-शुक्रवार ३ एप्रिल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती-मंगळवार, १४ एप्रिल, महाराष्ट्र दिन- शुक्रवार १ मे, बुद्ध पौर्णिमा-सोमवार ४ मे, रमजान ईद-शनिवार, १८ जुलै, स्वातंत्र्य दिन-शनिवार, १५ ऑगस्ट, पारसी न्यू इअर (पतेती)-मंगळवार, १८ ऑगस्ट, श्री गणेश चतुर्थी-गुरुवार, १७ सप्टेंबर, बकरी ईद-गुरुवार, २४ सप्टेंबर, महात्मा गांधी जयंती-शुक्रवार २ ऑक्टोबर, दसरा (विजया दशमी)-गुरुवार, २२ ऑक्टोबर, मोहरम-शनिवार, २४ ऑक्टोबर, दिवाळी (लक्ष्मीपूजन), बुधवार, ११ नोव्हेंबर, दिवाळी (बलीप्रतिपदा), गुरुवार, १२ नोव्हेंबर, गुरु नानक जयंती-बुधवार, २५ नोव्हेंबर,  ईद ए मिलाद- गुरुवार, २४ डिसेंबर आणि ख्रिसमस- शुक्रवार, २५ डिसेंबर
या नॅनो पंचांगात २०१५ मधील ग्रहणे, संकष्टी चतुर्थी चंद्रोदय, पुढील वर्षी येणारा अधिक आषाढ महिना, कोकिळा व्रत, बारा वर्षांनी येणारा नाशिक-त्र्यंबकेश्वर येथील सिंहस्थ कुंभमेळा आणि पंचांगविषयक अन्य माहिती देण्यात आली आहे.