11 August 2020

News Flash

नितीन भोसलेंच्या आमदार निधीतून नऊ बस थांबे

शहरातील प्रभाग क्र. ४८ आणि ४९ मध्ये आमदार निधीतून तयार करण्यात आलेल्या नऊ बस थांब्यांचे उद्घाटन आ. नितीन भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. महापालिका विभागीय अधिकारी

| February 6, 2013 12:11 pm

शहरातील प्रभाग क्र. ४८ आणि ४९ मध्ये आमदार निधीतून तयार करण्यात आलेल्या नऊ बस थांब्यांचे उद्घाटन आ. नितीन भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.
महापालिका विभागीय अधिकारी ए. पी. वाघ, उपअभियंता प्रकाश पठाडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. या बस थांब्यांमध्ये हेडगेवार नगर येथील दत्त मंदिर चौक, कामटवाडे गांव धन्वंतरी वैद्यकीय महाविद्यालयाजवळ, सिडकोतील त्रिमूर्ती चौक, जाधव संकुल, डीजीपी नगर, डीजीपी नगर-२ मधील वनश्री कॉलनी, अंबड लिंकरोडवरील साईग्राम, महाजननगर, उपेंद्रनगर यांचा समावेश आहे. दरम्यान, जगदंबा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आ. भोसले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आ. भोसले यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी सहल आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला. यावेळी नगरसेविका कांचन पाटील, दीपक मटाले, राजेश गाढवे, सचिन रोजेकर आदी उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 6, 2013 12:11 pm

Web Title: nine bus stop from nitin bhosle legislator fund
टॅग Development
Next Stories
1 नाशिकमध्ये आता ‘जिम्नॅस्टिक स्पोर्टस् स्कूल’
2 डाकीण ठरविलेल्यांना ‘अंनिस’ मुळे आधार
3 मुलींच्या आयटीआयमध्ये योग शिबीर
Just Now!
X