News Flash

पाथरीत ९ लाखांचा गुटखा जप्त

पाथरीतील साई रस्त्यावर पोलिसांनी सुमारे ९ लाख रुपयांचा गुटखा टेम्पोसह पाथरी पोलिसांनी जप्त केला. पाथरी शहरात परभणीहून एमएच २२ एन २१६४ या क्रमांकाच्या टेम्पोमधून मोठय़ा

| April 3, 2013 02:29 am

पाथरीतील साई रस्त्यावर पोलिसांनी सुमारे ९ लाख रुपयांचा गुटखा टेम्पोसह पाथरी पोलिसांनी जप्त केला. पाथरी शहरात परभणीहून एमएच २२ एन २१६४ या क्रमांकाच्या टेम्पोमधून मोठय़ा प्रमाणात गुटखा येत असल्याची माहिती पाथरी पोलिसांना मिळाली. त्यावरून पाथरी पोलीस ठाण्यातील कर्मचारी जोशी, टाक, वायवळ, अनवर यांनी सापळा रचून सोमवारी दुपारी दीड वाजता साई रस्त्यावरील अब्दुल गफार कच्छी यांच्या दुकानासमोर तो पकडला. टेम्पोचालक शे. हबीब शे. अनवर (दर्गा रोडी, परभणी) यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता टेम्पोत ९ लाखांचा गोवा या कंपनीचा गुटखा असल्याने त्याने सांगितले. हा गुटखा परभणीहून पाथरी येथे अब्दुल गफार कच्छी यांच्याकडे आणल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली.
या बाबत अन्न व औषध प्रशासन विभागाला माहिती देण्यात आली आहे.
या विभागाचे अधिकारी आल्यानंतरच या गुटख्याबाबत अधिक माहिती मिळणार आहे. पोलिसांनी शे. हबीब व अब्दुल कच्छी यास ताब्यात घेतले आहे.
जिल्हाभरात गुटखा माफियांनी थैमान घातले आहे. सर्वत्रच गुटखा विक्री जोरात सुरू आहे. यापूर्वीही परभणी, पाथरी, जिंतूर, सेलूतही लाखो रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला होता. हा गुटखा कोठून येतो याचा शोध घेऊन कारवाई करण्याची गरज आहे.
पूर्णा येथे पत्रकार दिनेश चौधरी यांनी गुटखा माफिंयाविरुद्ध लिखाण केल्यानेच त्यांच्यासह कुटुंबीयांवर अ‍ॅसिड हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यातील मुख्य आरोपी फरार आहे; पण पूर्णा येथे असलेले गुटखा विक्रीचे केंद्र उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना अपयश आले आहे. पाथरी येथे पकडण्यात आलेल्या गुटख्यानंतर जिल्ह्य़ात अजूनही गुटख्याची बेकायदेशीर साठेबाजी व विक्री होत असल्याचे उघडकीस आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2013 2:29 am

Web Title: nine lakhs gutkha forefeiture in pathri
Next Stories
1 कैद्यांना आठवडय़ातून दोनदाच मिळते स्नान!
2 पाटोदा पंचायतीत पाण्यावरून राडा
3 गतवर्षी भरमसाठ खर्च, यंदा मात्र निधीला कात्री!
Just Now!
X