News Flash

निर्मला राशिनकर यांचा सत्कार

बेलापूर पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष मारुती राशिनकर यांची कन्या निर्मला यांची मुख्याधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल रविवारी ग्रामस्थ तसेच विविध संघटनांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

| February 14, 2014 01:22 am

केवळ कार्यालयाची शोभा न वाढवता मिळालेल्या पदाचा वापर लोकांमध्ये राहून लोकांसाठी करायचा आहे, असे प्रतिपादन नव्यानेच मुख्याधिकारी पदासाठी निवड झालेल्या निर्मला राशिनकर यांनी केले.
बेलापूर पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष मारुती राशिनकर यांची कन्या निर्मला यांची मुख्याधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल रविवारी ग्रामस्थ तसेच विविध संघटनांच्या वतीने सत्कार करण्यात आला. बेलापूर पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्कर खंडागळे, सुनील मुथा, जनलक्ष्मी पतसंस्थेचे अध्यक्ष रवींद्र खटोड, ज्ञानेश गवले, र्मचट असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत लढ्ढा, उपसरपंच रफीक शेख, अॅड. विजय साळुंके आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
निर्मला म्हणाल्या सुरुवातीला आपल्याला अपयश आले तेव्हा आई-वडिल व मित्रांनी मानसिक आधार दिला. त्यामुळेच पुन्हा निर्धार केला आणि जिद्दीने तीन वर्षे दररोज चौदा तास अभ्यास केला व मेहनत घेतली. अखेर यश प्राप्त झाले.  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2014 1:22 am

Web Title: nirmala rashinkar honoured by srirampurkars
Next Stories
1 गृहमंत्र्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा
2 कृती समितीचे ‘चक्का जाम’
3 घोषणाबाजी अन् आक्रमकतेने आंदोलनाची औपचारिकता पूर्ण
Just Now!
X