05 March 2021

News Flash

‘खानावळी’शी स्पर्धा नाही

अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘यह जवानी है दिवानी’ या चित्रपटाने १०० कोटी रू पयांची कमाई केली आणि चित्रपटाचा नायक रणबीर क पूरला बॉलिवुडच्या शंभर कोटी क्लबचे

| June 12, 2013 08:07 am

अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘यह जवानी है दिवानी’ या चित्रपटाने १०० कोटी रू पयांची कमाई केली आणि चित्रपटाचा नायक रणबीर क पूरला बॉलिवुडच्या शंभर कोटी क्लबचे कायम सदस्यत्व मिळाल्यागत सगळीकडे चर्चा सुरू झाली. आपल्याबद्दलच्या या चर्चेने एरव्ही कोणताही नायक हुरळून गेला असता मात्र रणबीर कपूरने आपण बॉलिवुडच्या खानांशी स्पर्धाच करू शकत नाही, असे सांगत या चर्चेतली हवाच काढून टाक ली आहे. गेली दोन दशके ही तिन्ही खान मंडळी आपापल्यापरीने हिंदी चित्रपटसृष्टीवर राज्य करत आहेत. केवळ त्यांच्या नावावर चित्रपट करोडोची कमाई करतात. मला इथे येऊन फक्त पाच वर्षे पूर्ण झाली आहेत, असे सांगत सलमान, शाहरूख आणि आमिर यांच्याशीच काय तर बॉलिवुडमधील क कोणत्याच कलाकाराबरोबर आपल्याला स्पर्धा करायची नाही, असे रणबीरने स्पष्ट केले आहे.
सलमान आणि शाहरूखसारखे माझे वेगळे व्यक्तिमत्त्व नाही, त्यांच्यासारखा फिटनेस नाही आणि आमिरसारखा करिश्माही नाही. माझे चित्रपट चालायचे असतील तर सशक्त व्यक्तिरेखेवर आधारित चित्रपट करणे ही माझी गरज आहे. मग कुठल्या बळावर इतकी वर्षे चांगले-चांगले चित्रपट देणाऱ्या या कलाकारांशी स्पर्धा करणार?, असा सवाल रणबीरने केला आहे. एकेक पाऊल जपून टाकणाऱ्या रणबीरची चित्रपटांची निवड करतानाही चाकोरीबाहेरचे धोरण स्वीकारल्याचेही त्याने स्पष्ट केले आहे. त्याच्या मते एकाचवेळी चार-चार चित्रपट केले तर अभिनेता म्हणून कारकिर्द फुलण्यापेक्षा ती पाच वर्षांतच संपून जाईल. त्यामुळे अशी चित्रपटांची रांगच रांग पूर्ण करण्यात आपल्याला रस नसल्याचेही रणबीरने सांगितले. या निर्णयावर आमिरच्या परफेक्शनचा तर प्रभाव नाही ना?, यावर परफेक्शनपेक्षाही एकाचवेळी चार वेगवेगळ्या व्यक्तिरेखांना न्याय देण्याएवढी कला आपल्यात नाही, असे त्याचे म्हणणे आहे.
हल्ली एकेका चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण व्हायला १२० दिवस लागतात. त्यामुळे इतके दिवस एक चित्रपट केल्यानंतर लगेच दुसऱ्या भूमिकेत शिरण्यासाठी नक्कीच काहीएक वेळ लागतो. एका वर्षांत चार-चार चित्रपट हातावेगळे करण्याइतका हरहुन्नरीपणा आणि बुध्दीमत्ता माझ्यात नाही, हे स्वीकारूनच मी माझा मार्ग निवडला आहे, असे रणबीरने सांगितले. आताही ‘यह जवानी है दिवानी’च्या यशाबद्दल चर्चा करण्यापेक्षा त्याने अभिनव कश्यप दिग्दर्शित ‘बेशरम’ या चित्रपटावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. यात पहिल्यांदा तो आपल्या आईवडिलांबरोबर एकत्र काम करणार आहे. याशिवाय, अनुरागचा ‘बॉम्बे वेल्वेट’ आणि करण जोहरचा एक चित्रपट असे ओळीने तो एकेक चित्रपट पूर्ण करणार असल्याची माहिती त्याने दिली.  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2013 8:07 am

Web Title: no competition with three khans ranbir
टॅग : Ranbir Kapoor
Next Stories
1 एफआयआर संकेतस्थळावर टाकण्याचे आदेश
2 अमली पदार्थाच्या विक्रीला पायबंद नाहीच!
3 रात्रशाळेची पोरं हुश्शार
Just Now!
X