News Flash

‘विद्यार्थ्यांच्या मोबाईल प्रतिबंधावर प्रस्ताव नाही’

महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या मोबाईल वापरावर प्रतिबंध घालण्यासंदर्भात कोणताही प्रस्ताव अजून राज्य सरकार समोर नाही, असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी येथे स्पष्ट केले.

| July 10, 2013 01:50 am

महाविद्यालयांच्या परिसरात विद्यार्थ्यांना मोबाईल वापरावर प्रतिबंध आणण्याच्या विषयावरून सध्या उलट-सुलट चर्चा सुरू आहे. या पाश्र्वभूमीवर टोपे म्हणाले की, या संदर्भात राज्यातील एखादे विद्यापीठ, महाविद्यालय, विद्यार्थी संघटना अथवा अन्य कोणीही राज्य सरकारकडे मागणी केली नाही. त्यामुळे असा कोणता विचार समोरच आला नसल्याने त्या संदर्भात काहीही निर्णय राज्य सरकारच्या पातळीवर घेतला नाही. एखाद्या महाविद्यालयास अशा प्रकारचा निर्णय घ्यायचा असेल तर ती त्यांच्या अधिकारातील बाब ठरू शकेल. एखाद्या विद्यापीठाने असा प्रस्ताव पाठविला तर राज्य सरकार दोन्ही बाजूंचा विचार करून योग्य तो निर्णय घेईल. परंतु सध्या मात्र असा कोणताही विषयच समोर नाही, असेही टोपे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2013 1:50 am

Web Title: no proposal to prevention of stundents mobile rajesh tope
टॅग : Rajesh Tope
Next Stories
1 मुलांच्या भांडणावरून दोन कुटुंबीयांत जुंपली
2 ‘अंतर्गत सुरक्षेचा प्रश्न सक्षम यंत्रणा, जागरूक नागरिकच सोडवू शकतील’
3 परभणी पालकमंत्रिपद, लोकसभेसाठी शिष्टमंडळ मुंबईत
Just Now!
X