News Flash

प्राधिकरणास पाणी दरवाढीचा अधिकारच नाही- अॅड. गोमारे

लातूर शहरातील पाणीपुरवठा योजना चालवण्याचाच अधिकार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला आहे. पाणीदरात वाढ करणे अथवा मीटर बसवणे, असे अधिकाराच्या बाहेर जाऊन प्राधिकरण काम करणार असेल, तर

| November 22, 2013 01:45 am

लातूर शहरातील पाणीपुरवठा योजना चालवण्याचाच अधिकार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला आहे. पाणीदरात वाढ करणे अथवा मीटर बसवणे, असे अधिकाराच्या बाहेर जाऊन प्राधिकरण काम करणार असेल, तर खासगीकरणविरोधी संघर्ष समिती गप्प बसणार नाही, असा इशारा अॅड. उदय गवारे यांनी दिला.
समितीच्या वतीने जीवन प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता एस. जी. कलिके यांना निवेदन देण्यात आले. लातूर महापालिका, जीवन प्राधिकरण व खासगी कंपनी यांच्यात झालेला त्रिपक्षीय करार सुरुवातीला रद्द करावा, खासगी कंपनीने आपला बोराबिस्तरा केव्हाच गुंडाळला. त्रिपक्षीय करार मृतावस्थेत ठेवून आज ना उद्या तो जनतेच्या माथी मारण्याचा जीवन प्राधिकरणाचा हेतू असल्याचा आरोपही गवारे यांनी केला.
लातूर शहराला आठवडय़ातून एकदाच कसेबसे पाणी दिले जाते. मात्र, जीवन प्राधिकरण त्यासाठी मनमानी दरवाढ करते. यापुढील काळात पाणीदरात वाढ करण्याचा, तसेच नळाला मीटर बसविण्याचा बेकायदा प्रयत्न केल्यास खासगीकरण विरोधी संघर्ष समितीतर्फे पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता एस. जी. कलिके यांना भेटलेल्या शिष्टमंडळात अॅड. मनोहरराव गोमारे, अशोक गोिवदपूरकर, उदय गवारे, सुधीर धुत्तेकर, प्रदीप खंडापूरकर, त्र्यंबक स्वामी आदी सहभागी होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2013 1:45 am

Web Title: no rights to authority of increase water rate adv gaware
टॅग : City,Increase,Latur,Rights
Next Stories
1 जलस्वराज वसुलीचे गुऱ्हाळ कागदोपत्रीच!
2 देशभरातील पहिली वित्तीय साक्षरता चाचणी जानेवारीत
3 बससेवा बंद केल्याचा निषेध सेनेचा ‘सोनपेठ बंद’
Just Now!
X