News Flash

सीआयएसएफचा जवान आठवडय़ानंतरही बेपत्ता

ओएनजीसीच्या सुरक्षेत तैनात असलेल्या वासुदेव साईदा या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) जवानाच्या अपहरणाला एक आठवडा पूर्ण झाल्यानंतरही त्याचा न्हावा-शेवा पोलीस तसेच सीआयएसएफच्या जवानांकडून शोध

| September 4, 2014 07:04 am

ओएनजीसीच्या सुरक्षेत तैनात असलेल्या वासुदेव साईदा या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) जवानाच्या अपहरणाला एक आठवडा पूर्ण झाल्यानंतरही त्याचा न्हावा-शेवा पोलीस तसेच सीआयएसएफच्या जवानांकडून शोध सुरूच आहे. या संदर्भात अपहृत जवानांच्या शोधार्थ पोलिसांचे एक पथक त्याच्या मूळगावी पाठविण्यात आलेली होती. मात्र जवान गावी पोहोचलेला नाही. त्यामुळे त्याच्या अपहरणाबद्दल चिंता व्यक्त केली जात असून सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांच्याच सुरक्षेचा प्रश्न या घटनेमुळे ऐरणीवर आला आहे. जवानाचा शोध घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याची माहिती न्हावा-शेवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश देवरे यांनी दिली आहे.
ओएनजीसी तेल शुद्धीकरण प्रकल्पातून मुंबईतील प्रकल्पांना तेल व वायूचा पुरवठा वाहिन्यांच्या सुरक्षेसाठी जेएनपीटी बंदराच्या परिसरात उभारण्यात आलेल्या मनोऱ्यावर पहारा देणाऱ्या साईदा या जवानाचे २५ ऑगस्टला अपहरण झाल्याची तक्रार न्हावा-शेवा पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. या जवानाच्या अपहरणामुळे या परिसरातील पोलिसांची कुमक वाढविण्यात आलेली आहे. मागील आठवडाभरापासून पोलीस पथकांना या जवानाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असला तरी आजपर्यंत त्याचा तपास लागलेला नाही, पुढील तपासाकरिता जवानाच्या कुटुंबीयांना उरण येथे बोलाविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2014 7:04 am

Web Title: no trace of missing cisf jawan
Next Stories
1 २० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या खेळाच्या मैदानाचा प्रश्न निकाली
2 नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न
3 नवी मुंबईतील प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष
Just Now!
X