News Flash

पंचवटी परिसरात आज पाणी पुरवठा नाही

महापालिकेच्या पंचवटी येथील जलशुध्दीकरण केंद्राच्या विद्युत रोहित्राच्या कामामुळे गुरूवारी दुपारी वीज पुरवठा बंद ठेवावा लागणार आहे.

| May 22, 2014 12:29 pm

महापालिकेच्या पंचवटी येथील जलशुध्दीकरण केंद्राच्या विद्युत रोहित्राच्या कामामुळे गुरूवारी दुपारी वीज पुरवठा बंद ठेवावा लागणार आहे. यामुळे पंचवटीतील सर्व भागात या दिवशी दुपारी व सायंकाळी पाणी पुरवठा होणार नाही.
जलशुध्दीकरण केंद्रावर गुरूवारी विद्युत रोहित्र जोडणीचे काम केले जाणार आहे. त्यामुळे केंद्राचा वीज पुरवठा सकाळी अकरा ते दुपारी दोन या कालावधीत बंद राहणार आहे. वीज नसल्याने केंद्रात पाणी उचलणे व शुध्दीकरणाचे काम बंद ठेवावे लागणार आहे. त्यामुळे पंचवटीतील सर्व भागात गुरूवारी दुपारी व सायंकाळचा पाणी पुरवठा होणार नसल्याचे पाणी पुरवठा विभागाने म्हटले आहे. उपरोक्त काम कमी वेळेत पूर्ण झाल्यास कमी प्रमाणात का होईना पण पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न केला जाईल असे या विभागाने म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2014 12:29 pm

Web Title: no water supply today in panchavati area
Next Stories
1 निकालाने आघाडी भानावर, एकतेच्या तालावर
2 आरोग्य व्यवस्थेच्या नियोजनात नदी आडवी
3 छगन भुजबळांसाठीची ‘आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा’ही निष्प्रभ
Just Now!
X