News Flash

२०२जणांचा ठावठिकाणा नाही

मराठवाडय़ातून चारधाम यात्रेस गेलेल्या व्यक्तींना मदत करता यावी, या उद्देशाने मराठवाडय़ातून पाच प्रशासकीय अधिकारी, तसेच वैद्यकीय पथक उद्या (शनिवारी) डेहराडूनला रवाना होत आहे.

| June 22, 2013 01:15 am

मराठवाडय़ातून चारधाम यात्रेस गेलेल्या व्यक्तींना मदत करता यावी, या उद्देशाने मराठवाडय़ातून पाच प्रशासकीय अधिकारी, तसेच वैद्यकीय पथक उद्या (शनिवारी) डेहराडूनला रवाना होत आहे. उपजिल्हा अधिकारी महेंद्र हरपाळकर पथकाचे प्रमुख आहेत. मराठवाडय़ातून २०२जणांचा संपर्क होत नसल्याची माहिती प्रशासनाकडे होती. अधिकाधिक लोकांपर्यंत संपर्क व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू असून मराठवाडय़ातून गेलेल्या यात्रेकरूंना सुविधा देता यावी, यासाठी पथकाचे प्रयत्न असतील. पथकात तहसीलदार रूपेश शिनगारे, विभागीय आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कुऱ्हे, नायब तहसीलदार आर. एम. मुंडलोड व लिपिक वैभव भाले, याबरोबरच शासकीय वैद्यकीय अधिकारी मोहम्मद अन्सारी, वैजिनाथ राठोड, डॉ. सचिन सोळंके, डॉ. चंद्रशेखर गायके व डॉ. पवन जाधव यांचा समावेश आहे. पथकास ९४२२९७७६७७, ८४२२८७५८०८ या क्रमांकांवर संपर्क साधावा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2013 1:15 am

Web Title: no whereabouts of 202 persons
टॅग : Pilgrims
Next Stories
1 काँग्रेसमुक्त देश, आघाडीमुक्त राज्यासाठी कार्यकर्त्यांनी संघटित व्हावे – फडणवीस
2 देवेंद्र फडणवीस यांची कबुली
3 कृषी विद्यापीठ नामांतराचे भारिप-महासंघाकडून स्वागत
Just Now!
X