News Flash

कामगार नगरमध्ये घरांच्या बिनशेती परवान्याचे वाटप

महानगर पालिका प्रभाग क्र. २१ मध्ये कामगार नगरातील नागरिकांच्या घरांच्या बिनशेती परवाना उताऱ्यांचे नगरसेवक विक्रांत मते यांच्या प्रमुख उपस्थितीत वाटप करण्यात आले.

| January 22, 2013 12:43 pm

महानगर पालिका प्रभाग क्र. २१ मध्ये कामगार नगरातील नागरिकांच्या घरांच्या बिनशेती परवाना उताऱ्यांचे नगरसेवक विक्रांत मते यांच्या प्रमुख उपस्थितीत वाटप करण्यात आले. कामगार नगर हा प्रामुख्याने मध्यमवर्गीय व कामगार, कष्टकऱ्यांचा भाग. यातील बहुतेक घरांच्या जागांना बिनशेती परवाना प्रमाणपत्र मिळालेले नव्हते. या प्रश्नाचे महत्त्व लक्षात घेत वर्षभरापूर्वी महापालिका निवडणुकीप्रसंगी मते यांनी ही समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले होते. निवडून आल्यावर मते यांनी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करून ४८ प्रकरणांच्या बांधकामाची परवानगी मिळवून दिली.  या वेळी झालेल्या कार्यक्रमात मते यांनी कामगार नगरमधील उर्वरित रस्त्यांचे काँक्रीटीकरण, व्यायामशाळा तसेच अभ्यासिका, नवीन पथदीप तसेच कचऱ्याचा प्रश्नही सोडविण्याची ग्वाही दिली. या वेळी नगरसेवक उषाताई अहिरे, वास्तुविशारद डी. डी. आनेराव, संदीप हांडगे उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2013 12:43 pm

Web Title: non agricultural licence distribution to worker
Next Stories
1 सभा तहकुबीचा वाद अन् कार्यशैलीचे तरंगं
2 पोलीस व उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
3 सेवाभावी संस्थांच्या कार्याचा राजकारणाला आधार
Just Now!
X