News Flash

अंबरनाथमधील ‘त्या’ नगरसेवकांना जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस

नगराध्यक्षपद निवडणुकीत गैरहजर राहणाऱ्या अंबरनाथमधील नगरसेवकांना जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस बजावली असून, १५ जानेवारी रोजी त्यांची सुनावणी होणार आहे. ५ नोव्हेंबर २०१२ रोजी अंबरनाथच्या नगराध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात आली.

| January 11, 2013 01:41 am

नगराध्यक्षपद निवडणुकीत गैरहजर राहणाऱ्या अंबरनाथमधील नगरसेवकांना जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस बजावली असून, १५ जानेवारी रोजी त्यांची सुनावणी होणार आहे.
५ नोव्हेंबर २०१२ रोजी अंबरनाथच्या नगराध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात आली. आघाडीकडे २६ आणि महायुतीकडे २४ असे संख्याबळ असताना आघाडीतील चार नगरसेवक गैरहजर राहिले आणि युतीच्या उमेदवाराची नगराध्यक्षपदी निवड झाली.
 गैरहजर राहणाऱ्यांमध्ये काँग्रेसचे रवींद्र करंजुले, मनोज देवडे, रजनी तांबे, तर राष्ट्रवादीच्या नासीर कुंजाली या नगरसेवकांचा समावेश               होता.
गैरहजर नगरसेवकांविरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे गटनेते अनुक्रमे अ‍ॅड. यशवंत जोशी व सदाशिव पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. त्याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी नगरसेवकांना नोटीस बजावली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 11, 2013 1:41 am

Web Title: notice to ambernath that corporator
Next Stories
1 बीअर शॉप झाले तळीरामांचे अड्डे!
2 टिटवाळ्यात चोरटय़ांचा धुमाकूळ
3 शहापूरमध्ये विषबाधेने ८८ जनावरांचा मृत्यू
Just Now!
X