07 March 2021

News Flash

आता एसएमएसने मनीऑर्डर पाठवा!

आता एसएमएसवर मनीऑर्डर पाठवता येणार आहे. जिल्हय़ातील औसा, निलंगा, लातूर शहरातील टिळकनगर व गांधी चौकातील मुख्य कार्यालयात ही सुविधा उपलब्ध केली आहे.

| November 29, 2013 01:47 am

आता एसएमएसवर मनीऑर्डर पाठवता येणार आहे. जिल्हय़ातील औसा, निलंगा, लातूर शहरातील टिळकनगर व गांधी चौकातील मुख्य कार्यालयात ही सुविधा उपलब्ध केली आहे.
राष्ट्रीय टपाल धोरणानुसार सुरुवातीला ही योजना प्रायोगिक तत्त्वावर बिहार व पंजाब राज्यांसाठी सुरू केली होती. या दोन्ही राज्यांत मोठय़ा प्रमाणात मनीऑर्डर पाठवल्या जात होत्या. त्यानंतर ही योजना देशभर सुरू करण्यात आली. लातुरात या योजनेला नागरिकांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. टप्प्याटप्प्याने तुळजापूर, मुरुड, उस्मानाबादचे मुख्य डाकघर येथे ही योजना सुरू करण्यात येणार आहे. मोबाइल मनीऑर्डर करण्यासाठी १ हजार ते दीड हजार रुपयांसाठी ४५ रुपये, दीड हजार रुपये ते ५ हजार रुपयांपर्यंत ७९ रुपये, तर ५ हजार १ रुपयापासून ते १० हजार रुपयांपर्यंत ११२ रुपये कमिशन द्यावे लागणार आहे.
टपाल कार्यालयात पसे भरल्यानंतर तेथे पसे ज्याला पाठवायचे त्याचा मोबाइल क्रमांक व पाठवणाऱ्याचा क्रमांक द्यावा लागतो. टपाल खात्यातर्फे या दोघांनाही एसएमएस पाठवण्यात येतो. हा एसएमएस टपाल कार्यालयात दाखवून पसे उचलता येतात. या सुविधेचा लाभ ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक होईल, अशी माहिती मुख्य पोस्टमास्तर सी. एच. केदार व बी. सी. माळी यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2013 1:47 am

Web Title: now do the moneyorder through sms
Next Stories
1 अभियंता संघटनेची याचिका; खंडपीठाची सरकारला नोटीस
2 ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ला नांदेडकरांचा उदंड प्रतिसाद
3 भूकंपाच्या धक्क्याने नांदेडकरांमध्ये घबराट
Just Now!
X