भारतीय चित्रपट सृष्टीच्या शतकमहोत्सवाच्या निमित्ताने दूरदर्शनतर्फे ‘चित्रपटां’साठी पुरस्कार सुरू करण्यात येणार असून त्याचा वितरण सोहोळा ऑगस्ट महिन्यात मुंबईत करण्यात येणार आहे. अन्य संस्था किंवा वाहिन्यांकडून देण्यात येणाऱ्या चित्रपट पुरस्कारांसाठी १ जानेवारी ते ३१ डिसेंबर हे वर्ष गृहित धरले जाते. मात्र आम्ही १ जुलै ते ३० जून या कालावधीत प्रदर्शित झालेल्या चित्रपटांचा पुरस्कारांसाठी विचार करणार आहोत, असे शर्मा यांनी सांगितले. तसेच भारतीय चित्रपट सृष्टीच्या शतक महोत्सवाच्या निमित्ताने दूरदर्शन-मुंबईतर्फे एक विशेष कार्यक्रम मालिका सादर केली जाणार असून येत्या मे महिन्यापासून त्याचे प्रसारण सुरू होणार आहे. येत्या ७ मे रोजी दूरदर्शनच्या ‘प्रेरणा’पुरस्कार वितरण सोहोळ्याचा कार्यक्रम रवींद्र नाटय़ मंदिर, प्रभादेवी येथे आयोजित करण्यात आला आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या ‘आई-मुलगी’ अशा नऊ जोडय़ांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचेही शर्मा यांनी सांगितले.