पक्षकारांना न्याय मिळवून देण्यासाठी आता विधी खात्याने मोबाईल सेवा हा अनोखा उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे. त्याची सुरुवात इचलकरंजीत उद्या मंगळवारी व बुधवारी होणार असून याचे आयोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर व तालुका विधी सेवा समिती हातकणंगले यांच्या वतीने करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा न्यायाधीश ए. ए. शहापुरे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
विधी खात्याच्या वतीने ‘टूर प्रोग्रम ऑफ मोबाईल लीगल सव्‍‌र्हीस कम लोकअदालत’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. संपूर्ण राज्यात हा उपक्रम राबविला जाणार असून त्याची सुरुवात सोलापूर जिल्ह्यात करण्यात आली आहे. आता कोल्हापूर जिल्ह्यात या उपक्रमाचे ३ ते २४ डिसेंबर अखेर आयोजन केलेले आहे. मंगळवारी या उपक्रमाचा प्रारंभ जिल्हा विधी सेवा समितीचे सचिव योगेश राणे, जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. ए. शहापुरे व बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. संजय गजबी यांच्या उपस्थितीत होत आहे.
मंगळवारी लक्ष्मी औद्योगिक वसाहत येथे दुपारी १ वाजता जागतिक एड्स दिन, दुपारी ३.३० वाजता हातकणंगले तहसील कार्यालय येथे भूमिसंपादन कायदा व महसूल कायदा, हुपरी ग्रामपंचायत येथे सायंकाळी ६ वाजता चलन दस्त ऐवज कायदा या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तर ४ डिसेंबर रोजी विवेकानंद कॉलेज येथे सकाळी १० वाजता महिला व मुलांचे हक्क, नगरपालिका नूतन इमारतीत दुपारी १ वाजता माहितीचा अधिकार, जिल्हा न्यायालय येथे दुपारी ३ वाजता लोकअदालत व गावचावडी शहापूर येथे सायंकाळी ६ वाजता मध्यस्थी प्रकरणाबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. न्या. शहापुरे, न्या. कानडे, न्या. एस. पी. नाईक-िनबाळकर, न्या. ए. डी. लोखंडे, न्या. एस. एन. सरडे, न्या. ए. डी. घुगे व न्या. जी. एम. कोल्हापूरे हे मार्गदर्शन करणार आहेत. या उपक्रमाचा लाभ नागरिकांनी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी मलकारी लवटे, मधुकर पाटील, साताप्पा भवान, महादेव गौड, सयाजी चव्हाण, महेश बोहरा, सतीश मलमे, भारत पोवार, भारत शिविलगे, मंगल मुसळे, आप्पा पाटील, राजू आलासे आदींसह शिवसनिक उपस्थित होते.